विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 प्रादुर्भावाच्या काळात एआरसीआयने केलेल्या हॅन्ड सॅनीटायझरचे पोलिसांना वाटप

Posted On: 03 APR 2020 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

बाजारातली  हॅन्ड सॅनीटायझरची टंचाई लक्षात घेऊन,केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या हैदराबाद इथल्या एआरसीआय या स्वायत्त  संशोधन आणि विकास केंद्राने जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषांनुसार हॅन्ड सॅनीटायझरची निर्मिती करून त्याचे हैदराबाद इथल्या पोलिसांना, संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना वाटप केले. संशोधक ,विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या चमूने स्वतःहून पुढाकार घेत,सुमारे 40 लिटर सॅनीटायझर तयार केले.

निर्मितीपॅकेज, वितरण या सर्वाची तयारी केवळ 6 तासात पूर्ण झाली.विद्यार्थी तसेच संस्थेच्या उपहार गृहात काम करणारा वर्ग,संशोधक या सर्वाना हे , सॅनीटायझर पुरवण्यात आले त्याच बरोबर प्रवेशद्वार आणि इतर ठिकाणीही ठेवण्यात आले. संघ भावना,आपत्तीकाळात योगदान देण्याची तीव्र इच्छा,काळजी आणि एआरसीआयच्या संबंधितांबाबत आस्था या भावनेतून इतक्या अल्प काळात हे शक्य झाले. 

सोशल डीस्टन्सिगची अंमलबजावणी करण्यासाठी जोखीम घेत अथक काम करणाऱ्या पोलिसांना हे सॅनीटायझर पुरवण्यासाठी त्याची निर्मिती वाढवावी असे एआरसीआयचे संचालक डॉ पद्मनाभम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानुसार राचाकोंडा पोलीस उपायुक्तांकडे, हे सॅनीटायझर, एआरसीआयचे जेष्ठ वैज्ञानिक आर विजय यांनी सुपूर्त केले.

वैज्ञानिकांनी केलेल्या या उपक्र्माची  त्यांनी प्रशंसा केली आणि आणखी सॅनीटायझर निर्मिती करून ते पुरवण्याची विनंती केली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, हात,जिन्याचे कठडे, दरवाज्याच्या मुठी  सॅनीटायझरने स्वच्छ कराव्यात, असे आवाहन  करण्यात आले आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1610775) Visitor Counter : 140