कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयकार -सिफा यांच्या वतीने चौदाव्या भारतीय मत्स्यपालन आणि जलशेती परिषदेचे आयोजन


भारत तसेच अन्य सहा देशांमधील एक हजाराहून अधिक प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय आणि जलशेतीसाठी नवनवीन संकल्पना व शाश्वत मार्गांचा शोध घेण्यासाठी येणार एकत्र

Posted On: 19 NOV 2026 5:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026

भारतीय मत्स्यपालन आणि जलसंवर्धन मंचाच्या (14IFAF), चौदाव्या प्रमुख आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेला आज ओदिशातील भुवनेश्वरच्या केंद्रीय गोड्या पाण्यातील जलसंवर्धन संस्था (ICAR-CIFA) येथे आज सुरूवात झाली. एशियन फिशरीज सोसायटी, भारतीय शाखा (AFSIB), आयसीएआर-सीआयएफए, भारत सरकारचा मत्स्यपालन विभाग, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (NFDB), ओडिशा सरकारचा मत्स्यपालन आणि पशुधन विकास विभाग (FARD) आणि जलसंवर्धक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 20 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वैज्ञानिक ज्ञानाला चालना देणे, तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि संशोधक, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील भागधारक व शेतकरी समुदाय यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणे यावर लक्ष केंद्रित करून, “जलशेतीचे संवर्धन आणि मत्स्यव्यवसायाचे परिवर्तन: विज्ञान आणि समाज यांच्यातील दुवा” या संकल्पनेखाली ही परिषद आयोजित केली जात आहे.

या परिषदेत भारत आणि अन्य सहा देशांमधून शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योजक, उद्योग प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यासह 1000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत; अशी माहिती आयकार-सीफाचे संचालक आणि परिषदेचे संयोजक डॉ. पी. के. साहू यांनी दिली आहे.

या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेदरम्यान होणाऱ्या चर्चासत्रांत मत्स्यव्यवसायासाठी शाश्वत पध्दतीचे व्यवस्थापन, जळातील परिसंस्थेचे संवर्धन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जीनोम संपादन, उत्तम प्रकारचे मत्स्यपालन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, खाद्य विकास, जलचर प्राण्यांचे आरोग्य आणि अनुवांशिक सुधारणा या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

या परिषदेदरम्यान 20 एजन्सींच्या सहभागाने मत्स्यव्यवसाय आणि जलशेती क्षेत्रातील तंत्रज्ञान, नवोपक्रम, उत्पादने आणि सेवा यांचे एक प्रदर्शन आयोजित केले  आहे. या प्रदर्शनामुळे उद्योग क्षेत्रातील भागधारक, संशोधक आणि शेतकरी यांना संवाद साधण्याची, तांत्रिक उपाय शोधण्याची आणि सहयोगी भागीदारी प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध होईल. याशिवाय उदघाटन समारंभात वैज्ञानिक प्रकाशनांचे प्रकाशन आणि या क्षेत्रातील योगदानाबद्दल असोसिएशन ऑफ ॲक्वाकल्चरिस्ट्सतर्फे विख्यात मत्स्यशास्त्रज्ञांना फेलो पुरस्कार देण्यात येणार आहेत.

शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2338623) अभ्यागत कक्ष : 14