Posted On:
29 OCT 2026 11:36AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अर्णब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश, पुदुचेरी, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.
आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह म्हणाले आहेत,
“अर्णब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, आंध्र प्रदेश, पुदुचेरी, ओडिशा आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि या आपत्तीमुळे लोकांचे होणारे हाल कमी करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तातडीने कामाला लागली असून युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू झाले आहे. आपत्तीचे परिणाम आणि आवश्यक त्या पुढील मदतीचा अंदाज घेण्यासाठी लवकरच आयएमसीटी (IMCTs) पाठवण्यात येतील. भारत सरकार खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे आहे.”
* * *
आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai