पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सरकारप्रमुख म्हणून राष्ट्रसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

Posted On: 07 OCT 2026 9:06PM by PIB Mumbai

भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. भारत आणि भूतान हे परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित अशा चिरस्थायी भागीदारीने बांधले गेले  आहेत, असे नमूद करत मोदी यांनी 'विकसित भारत' आणि 'समृद्ध भूतान' या सामायिक उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी आपले घनिष्ठ सहकार्य असेच सुरू ठेवण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :

“पंतप्रधान तोबगे, तुमच्या स्नेह आणि भावपूर्ण संदेशाबद्दल मनापासून आभार.

विकसित भारत आणि समृद्ध भूतानचे आपले सामायिक उद्दिष्ट  पूर्ण करण्यासाठी आपल्यातील घनिष्ठ सहकार्य असेच पुढे नेण्यास मी उत्सुक आहे.

@tsheringtobgay”

***

NehaKulkarni / SavitaMhaskar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326436) अभ्यागत कक्ष : 20