पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल बंटी याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 6:40PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या टी64 उंच उडी प्रकारात बंटी याने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

बंटी याने मोठी क्षमता आणि दृढनिश्चय दाखवून दिला आहे, असे नमूद करून पंतप्रधानांनी या यशामुळे त्याला आणखी उंच ध्येय ठेवण्याचा आणि आगामी वर्षांमध्ये अधिक यश मिळवण्याचा आत्मविश्वास मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या टी64 उंच उडी प्रकारात बंटी याने रौप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे. त्याने मोठी क्षमता आणि दृढनिश्चय दाखवून दिला आहे. या यशामुळे त्याला आणखी उंच ध्येय ठेवण्याचा आणि आगामी वर्षांमध्ये अधिक यश मिळवण्याचा आत्मविश्वास मिळो, ही सदिच्छा. : पंतप्रधान @narendramodi”

***

Nilima Chitale / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326261) अभ्यागत कक्ष : 6