पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 20 OCT 2026 9:40PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F43/F44/F62/F64 प्रकारात, वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी  नोंदवत कांस्यपदक जिंकणाऱ्या प्रदीप कुमार याचे अभिनंदन केले.

स्वतःच्या सामर्थ्याबाहेर  जाण्यासाठी त्याने दाखवलेली जिद्द प्रशंसनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले असून शुभेच्छाही दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स'  वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

"प्रदीप कुमारने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026  मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F43/F44/F62/F64 प्रकारात कांस्यपदक पटकावले असून, त्याने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली आहे. स्वतःच्या सामर्थ्याबाहेर  जाण्यासाठी त्याने दाखवलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! - पंतप्रधान @narendramodi"

***

Neha Kulkarni / Nilima Chitale / madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326090) अभ्यागत कक्ष : 9