पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले प्राची पांडेचे अभिनंदन

Posted On: 20 OCT 2026 7:26PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी क्लास 6 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्राची पांडेचे अभिनंदन केले.

पदार्पणाच्या स्पर्धेतच कांस्यपदक जिंकणे ही भारतीय पॅरा टेबल टेनिसमधील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी प्राची पांडेचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“भारतीय पॅरा टेबल टेनिसमधील एक ऐतिहासिक कामगिरी!

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी क्लास 6 प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान प्राची पांडेने मिळवला आहे. तिने पदार्पणातच मिळवलेले कांस्यपदक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन, PM @narendramodi”

***

NehaKulkarni / ShraddhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325700) अभ्यागत कक्ष : 18