पंतप्रधान कार्यालय
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आयुष वर्माचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ 53/54 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आयुष वर्माचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
आयुष याच्यासाठी हे पदार्पण संस्मरणीय ठरल्याचे नमूद करताना पंतप्रधान मोदी यांनी आशा व्यक्त केली की, आयुष या यशाच्या बळावर पुढे वाटचाल करेल आणि क्रीडाक्षेत्रात आपली छाप पाडत राहील. त्यांनी आयुषला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील संदेशात म्हटले आहे:
“आयुष वर्मा याचे पदार्पण संस्मरणीय ठरले! पुरुषांच्या भालाफेक एफ 53/54 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याने या यशाच्या बळावर पुढे वाटचाल करावी आणि क्रीडाक्षेत्रात आपली छाप पाडत राहावी. त्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा : PM @narendramodi"
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325637)
अभ्यागत कक्ष : 8