पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-कॅनडा धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात सकारात्मक चर्चा

Posted On: 13 OCT 2026 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा केली.

भारत-कॅनडा संबंधांमधली सकारात्मक गती कायम ठेवून व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जनतेचे परस्पर संबंध यांसह धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साधण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

भारत आणि कॅनडा अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीत योगदान देत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली.

भारत-कॅनडा संबंधांमधली सकारात्मक गती पुढे कायम ठेवण्यावर आणि व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा तसेच लोकांमधील परस्पर संबंध यांसह उभय देशांच्या धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साधण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर आमचे एकमत झाले.

भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीत योगदान देत आहेत.

@MarkJCarney”

सुषमा काणे /निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2323322) अभ्यागत कक्ष : 7