गृह मंत्रालय
नवी दिल्ली येथे पहिली बिमस्टेक गृहमंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्याचा सन्मान भारताला – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांशी संबंधित कट्टरतावाद, मानवी तस्करी, अवैध आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा सामना करण्याचा आपला सामायिक निर्धार या बैठकीतून अधोरेखित होतो - अमित शाह
निर्णायक समन्वयाच्या माध्यमातून बिम्सटेक क्षेत्र अधिक सुरक्षित, अधिक मजबूत आणि अधिक संरक्षित करण्यासाठी वचनबद्ध
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांचे आणि प्रतिनिधी मंडळाचे स्वागत
Posted On:
12 OCT 2026 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सांगितले की, 13 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या पहिल्या बिमस्टेक गृहमंत्रीस्तरीय बैठकीचे यजमानपद भूषण हा भारतासाठी सन्मान आहे.
X या समाज माध्यमावरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “13 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या पहिल्या बिमस्टेक गृहमंत्री बैठकीचे आयोजन करण्याचा सन्मान भारताला मिळाला आहे.” मी सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांचे आणि प्रतिनिधी मंडळांचे मनःपूर्वक स्वागत करतो. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांशी संबंधित कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा सामना करण्याच्या आपला सामायिक निर्धार अधोरेखित होतो. निर्णायक समन्वयाद्वारे, आम्ही अधिक सुरक्षित, अधिक सामर्थ्यवान आणि अधिक संरक्षित बिमस्टेक प्रदेश घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322546)
अभ्यागत कक्ष : 5