माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताच्या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाचा भाग बना : 57 व्या इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 आहे
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी 2026 साठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 आहे. या महोत्सवाचे वार्तांकन करू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी मुदत संपण्यापूर्वी पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी)अधिकृत मान्यता पोर्टलद्वारे आपली नोंदणी पूर्ण करावी.
हा महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गोव्यात पणजी येथे होणार आहे. या निमित्ताने भारत आणि जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ,आणि चित्रपटप्रेमी एकत्र येणार आहेत.
माध्यम प्रतिनिधी अधिकृत मान्यता पोर्टलद्वारे 'माध्यम प्रतिनिधी'(Media Delegate) म्हणून नोंदणी करू शकतात:
नोंदणी लिंक: https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx
माध्यम प्रतिनिधींनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी नोंदणी संबंधी मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचावीत आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत ना याची खात्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- छायाचित्र
- शासकीय ओळखपत्र
- पत्र सूचना कार्यालय किंवा राज्य सरकारचे अधिस्वीकृती ओळखपत्र / संस्थेचे ओळखपत्र + संपादकांचे पत्र
- संबंधित क्षेत्रातील कामाचा पुरावा
पात्रतेचे तपशीलवार निकष आणि माध्यम अधिस्वीकृती धोरणाची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
इफ्फीच्या गतवर्षीच्या, म्हणजेच 56व्या महोत्सवासाठी पोर्टलवर आधीच नोंदणी केलेल्या माध्यम प्रतिनिधींना त्यांची जुनीच माहिती (लॉगिन तपशील) वापरून लॉगिन करता येईल, आणि आवश्यकतेनुसार त्यांचे दस्तावेज अद्ययावत करता येतील.
माध्यम अधिस्वीकृती संबंधित शंका/प्रश्नांसाठी, अर्जदार iffi.mediadesk@pib.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.
याशिवाय, माध्यम प्रतिनिधी नसलेले चित्रपटप्रेमी देखील https://www.iffigoa.org/delegate-registration या संकेतस्थळाद्वारे ‘प्रतिनिधी’ (Delegates) म्हणून इफ्फी साठी नोंदणी करू शकतात आणि 57 व्या इफ्फी 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या विविध चित्रपटांचा तसेच इतर उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.
इफ्फीबद्दल
1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट सोहळा आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (एनएफडीसी) आणि गोवा राज्य सरकारची 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा' (ईएसजी) यांच्या वतीने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, आघाडीचे प्रतिथयश कलाकार आणि उदयोन्मुख अभिव्यक्ती एकत्र येत असतात. गोव्याच्या उत्साही वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मास्टरक्लास अर्थात दिग्गजांच्या कार्यशाळा आणि विशेष गौरव सत्रांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा, भाषा आणि चित्रपट परंपरांचा गौरव केला जातो. 57व्या इफ्फी 2026 संदर्भातील अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी https://www.iffigoa.org/. या संकेतस्थळाला भेट द्या.

शैलेश पाटील/सुषमा काणे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322412)
अभ्यागत कक्ष : 8