पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'विकसित भारता'ला आकार देणारे आणि 'ग्लोबल साउथ'ला प्रेरणा देणारे नेतृत्व आणि सेवा यावर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला आहे
Posted On:
07 OCT 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून विवेक, करुणा, धैर्य आणि निःस्वार्थ सेवा यांचे कशाप्रकारे दर्शन होते, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
'विकसित भारत' हे या मूल्यांचे सर्वात स्पष्ट प्रतीक असून ते भारताला एक सामायिक दृष्टीकोन प्रदान करते आणि लोकांना ते साकारण्यासाठी प्रेरणा देते, यावर तोबगे यांनी प्रकाश टाकला आहे, त्याचबरोबर एक सामर्थ्यवान भारत आपल्या शेजारील राष्ट्रांसाठी आणि ग्लोबल साउथसाठीही अधिक काही करू शकतो, यावरही त्यांनी भर दिला.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X समजमाध्यमावर वर पोस्ट केले आहे:
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विवेक, करुणा, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे, असे भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी लिहिले आहे.त्यांच्या मते, 'विकसित भारत' ही या मूल्यांची सर्वात स्पष्ट अभिव्यक्ती आहे, जी भारताला एक सामायिक दृष्टीकोन देते आणि लोकांना ते साकारण्यास मदत करण्यासाठी प्रेरित करते.
एक अधिक सामर्थ्यवान भारत आपल्या शेजारी राष्ट्रांसाठी आणि ग्लोबल साउथसाठीही अधिक काही करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. नेतृत्व आणि सेवेवरील हे एक विचारप्रवर्तक चिंतन आहे.”
आशिष सांगळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320165)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
Bengali
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada