पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 27 SEP 2026 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे अभिनंदन केले.

उत्कृष्ट कामगिरी करत सर्वेशने या क्रीडा प्रकारातील पदकासाठी भारताची पाच दशकांची प्रतीक्षा संपवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या बळावर मिळवलेले हे यश खरोखरच संस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये म्हटले:

“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सर्वेश कुशारे याने पटकावले ऐतिहासिक रौप्यपदक! उत्कृष्ट कामगिरी करत त्याने या क्रीडा प्रकारातील पदकासाठी भारताची पाच दशकांची प्रतीक्षा संपवली आहे. चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या बळावर मिळवलेले हे यश खरोखरच संस्मरणीय आहे. PM @narendramodi” 

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315700) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English , Assamese , Gujarati