ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीडीयू-जीकेवाय 2.0 अंतर्गत, ऑक्टोबर 2026 पासून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 70,000 ग्रामीण युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण सुरू होणार


ग्रामीण विकास मंत्रालयांकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये डीडीयू-जीकेवाय 2.0 च्या अंमलबजावणीला गती

Posted On: 25 SEP 2026 9:31AM by PIB Mumbai

ग्रामीण विकास मंत्रालयाने, ऑक्टोबर 2026 पासू बहुतांश राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू-जीकेवाय) 2.0 अंतर्गत प्रशिक्षणाचे गट सुरू करण्याची तयारी केली आहे. डीडीयू-जीकेवाय 2.0 पोर्टलनुसार, (https://kaushal.rural.gov.in) 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्रकल्प अंमलबजावणी संस्थांसाठी (पीआयए) 1200 हून अधिक प्रकल्पांसाठी 5.6 लाख प्रशिक्षण उद्दीष्ट निश्चित केली आहेत. इतर राज्यांमध्येही उद्दिष्ट निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. देशभरात 24 राज्ये/केंद्रशासत प्रदेशांमध्ये ऑक्टोबर 2026 मध्ये जवळपास 70,000 ग्रामीण तरुणांचा समावेश असलेल्या 2,015 गटांचे प्रशिक्षण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

डीडीके-जीकेयू ही केंद्र पुरस्कृत योजना असून त्याद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराशी निगडीत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने ते 12 महिन्यांपर्यंतचा असतो. डीडीयू-जीकेवाय 2.0 अंतर्गत 2026-28 या दोन वर्षांच्या कालावधीत सहभागी असलेल्या सर्व 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी एकंदर 9 लाखांहून अधिकचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची रोजगार क्षमता टिकून राहाण्यासाटी राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी युवकांना संघटित करून मागणीनुसार सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याशी संलग्न अभ्यासक्रमांमध्ये रोजगार संलग्न कौशल्य प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे.

मंत्रालयाने, राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी कृती करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना, अंमलबजावणी करणाऱ्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांना उद्दिष्टांचे जलद वाटप करण्यास आणि नियोजित वेळेनुसार गट सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रशिक्षण सुरू करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना उद्दिष्टांचे वाटप सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. हे गट सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसमवेत टप्प्याटप्प्याने आढावा बैठका आयोजित केल्या जात आहेत.

***

NitinFulluke / VijaylakshmiSalvi / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314729) अभ्यागत कक्ष : 8