ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
दिशाभूल करणाऱ्या टिपिंग प्रॉम्प्ट्स आणि डार्क प्रणाली साठी सीसीपीए ने रॅपिडोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला
सीसीपीए ला रॅपिडोच्या च्या राइड-बुकिंग इंटरफेसमध्ये कन्फर्म शेमिंग आणि इंटरफेस हस्तक्षेप आढळले
ग्राहकांना अधिक पैसे देण्यासाठी अनिवार्य किंवा भरीस पाडणाऱ्या सूचना आणि पद्धती बंद करण्याचे सीसीपीएचे रॅपिडोला निर्देश
Posted On:
15 SEP 2026 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, सीसीपीए च्या मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म अर्थात वाहन बुकींग करण्याचे व्यासपीठ चालवणाऱ्या रॅपिडोचे संचालन करणाऱ्या रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अनुचित व्यापार पद्धती, अनुचित करार आणि डार्क पॅटर्न साठी ₹ 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
प्री-राइड टिपिंग आणि डायनॅमिक किंमतीशी संबंधित पद्धतींचे परीक्षण करण्यासाठी सीसीपीए द्वारे भारतात कार्यरत कॅब आणि बाईक-टॅक्सी एग्रीगेटर प्लॅटफॉर्मच्या क्षेत्र-व्यापी तपासणीनंतर ही कारवाई केली जाते. त्याच्या विविध प्लॅटफॉर्मच्या तपासणीदरम्यान, रॅपिडो ॲपवर “अधिक किंमत, वाहन मिळण्याची अधिक शक्यता” आणि “कॅप्टन ₹60 स्वीकारत नाहीत, +10, +20, +30” जोडून पहा”, अशा सूचना रायडरच्या बुकिंगवर प्रक्रिया सुरू असतानाच दिल्या जात असल्याचे आढळले
हे कन्फर्म शेमिंग प्रकारात येणारे वर्तनही सीसीपीए ला आढळले.
सीसीपीए ला आढळले की रॅपिडोच्या अल्गोरिदमने प्रथम रायडरला भाडे दाखवले आणि रायडरने त्या भाड्यावर बुक केल्यानंतर, कॅप्टन मूळ किंमत स्वीकारत नसल्याच्या कारणावरून रायडरला अधिक पैसे देण्यास प्रवृत्त केले. या पद्धतीने असा चुकीचा आभास निर्माण केला आहे, की रायडरने आधीच बुकिंगसाठी वचनबद्ध केलेले असताना आणि त्याला वाटाघाटी करण्यासाठी मर्यादित वाव असलेल्या अचूक टप्प्यावर राइडरची पटकन राइड मिळण्याची शक्यता अतिरिक्त रक्कम भरण्यावर अवलंबून असते. ही पद्धत कन्फर्म शेमिंग करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, जी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वे अंतर्गत ओळखल्या जाणारे डार्क पॅटर्न, डार्क 20 आणि पॅटर्न अट 23 चा नियम म्हणून ओळखला जातो. म्हणजेच, घाई असल्याची कृत्रिम भावना निर्माण केली जाते आणि जर ग्राहक अधिक पैसे देण्यास सहमत नसेल तर त्याला राइड गमावण्याची भीती दाखवली जाते.
आधीच भरलेली (ऍडवान्सड) रक्कम ही 'टिप 'मानता येणार नाही.
सीसीपीए ने नमूद केले की, बुकिंगच्या वेळी प्रवाशाला दाखवल्या जाणाऱ्या भाड्यामध्ये अंतर, वेळ, वाहतूक कोंडी, टोल आणि चालकाला (कॅप्टनला) द्यायचे पैसे यांसारख्या घटकांचा आधीच समावेश केलेला असतो. त्यामुळे,राईड सुरू होण्यापूर्वी त्याच राईडसाठी प्रवाशाने अतिरिक्त रक्कम द्यावी, असे सुचवण्यामागे कोणतेही उचित कारण सीसीपीएला आढळले नाही. सीसीपीएने निरीक्षण नोंदवले की, टिप साधारणपणे सेवा मिळाल्यानंतर स्वेच्छेने दिली जाणारी रक्कम असते आणि ती सेवा पुरवण्याची अट म्हणून सादर करता येणार नाही.
सीसीपीए ने 'मोटर वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे, 2025 ' चाही उल्लेख केला ; यानुसार, 'टिप' देण्याची बाब केवळ राईड पूर्ण झाल्यानंतरच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, बुकिंगच्या वेळी किंवा राईड सुरू असताना नाही. रॅपिडोचा असा युक्तिवाद होता की, टिप देणे ही ऐच्छिक बाब आहे; प्रवाशाने अतिरिक्त रक्कम दिली किंवा नाही, तरीही कंपनीचे 'मॅचिंग अल्गोरिदम' आपले काम करतच राहते; तसेच, प्रॉम्प्टस (prompts) खरेतर प्रवासी आणि चालक यांच्यातील प्रत्यक्ष संभाषणासारखीच 'रिअल-टाइम' वाटाघाटीची प्रक्रिया दाखवतात.
सीसीपीए ने हे दावे फेटाळून लावले. आयोगाचे निरीक्षण नोंदवले की, या 'प्रॉम्प्ट्स'ची वेळ आणि रचना अशी होती की रायडरवर दबाव निर्माण होईल ज्यावेळी रायडर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक अवलंबून असतो. शिवाय, अतिरिक्त रक्कम भरल्यामुळे रायडरला राईड मिळण्याची शक्यता खरोखरच वाढते, हे सिद्ध करणारा कोणताही डेटा 'रॅपिडो'ने सादर केला नव्हता. त्यामुळे, हा दावा निराधार आणि दिशाभूल करणारा असल्याचे मानण्यात आले.
राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म्सची क्षेत्र-व्यापी छाननी
रॅपिडोवरील कारवाई ही राइड-हेलिंग आणि बाइक-टॅक्सी प्लॅटफॉर्म्सवरील ऍडवान्सड टीप आणि डार्क-पॅटर्न पद्धतींबाबत सीसीपीएच्या व्यापक छाननीचा एक भाग आहे. सीसीपीए ने यापूर्वी उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्री यांसारख्या प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली होती, ज्यात त्यांना 'डार्क पॅटर्न्स प्रतिबंध आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे, 2023 ' चे पालन करण्याचे आणि अनुपालनासंदर्भात स्वयं-घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात सीसीपीए कडून उबर आणि ओला यांची तपासणी सध्या सुरू आहे.
अंतिम आदेश सीसीपीएच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
राधिका अघोर/राजेश शिरभाते/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310631)
अभ्यागत कक्ष : 10