राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला  राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 13 SEP 2026 4:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे :

“गणेश चतुर्थीच्या पावन प्रसंगी, देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि सदिच्छा व्यक्त करते.

भगवान गणेश हे बुद्धी, विवेक, समृद्धी आणि शुभारंभाचे  प्रतीक आहेत. गणेश चतुर्थी आपल्या जीवनात उत्साह, ज्ञान आणि सकारात्मकता घेऊन येतो. हा पवित्र सण आपल्याला जीवनात नवनव्या संकल्पासह  प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

भगवान गणेश सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत, अशी मी प्रार्थना करते. आपण सर्व मिळून राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देण्याचा संकल्प करूया.”

***

सोनाली काकडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309760) अभ्यागत कक्ष : 12