राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 03 SEP 2026 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2026

 

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की: -

“जन्माष्टमीच्या या मंगलमय प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनापासून शुभेच्छा देते.

भगवान श्रीकृष्ण यांचे जीवन आणि त्यांची शिकवण भारतीय सांस्कृतिक तसेच तात्विक वारशाला नवचैतन्य प्रदान करते. भगवान श्रीकृष्णांनी सत्य, धर्म, न्याय, करुणा आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सामावलेली त्यांची शिकवण, कठीण प्रसंगी विवेकी निर्णय घेण्यासाठी आणि नैतिक मूल्यांवर ठाम राहण्यासाठी मानवजातीला सदैव प्रेरणा देत राहते.

जन्माष्टमीचा हा पवित्र सण आपल्याला सामंजस्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाची भावना जोपासण्याची प्रेरणा देतो.

या शुभ प्रसंगी, भगवान श्रीकृष्णांच्या आदर्शांचे पालन करण्याचा आणि सर्वसमावेशक तसेच विकसित भारत घडवण्यासाठी अविरत कार्य करत राहण्याचा आपण संकल्प करूया.”

 

* * *

सुषमा काणे/संदेश नाईक/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306554) अभ्यागत कक्ष : 10