युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024’ जाहीर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 सोबत या पुरस्कारांचेही वितरण
Posted On:
02 SEP 2026 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने 2024 चे ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ (TNNAA) जाहीर केले आहेत. या पुरस्कारांत भूमीवरील साहस, जलसाहस, हवाई साहस आणि जीवनगौरव अशा चार श्रेणींचा समावेश आहे.
हे पुरस्कार साहस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यासाठी दिले जातात. तसेच आव्हानात्मक परिस्थितीत सहनशक्ती, जोखीम पत्करण्याची तयारी, सांघिक भावना आणि जलद व प्रभावी निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. भारत सरकारने ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024’ साठी पुढील पुरस्कारार्थींच्या नावांना मंजुरी दिली आहे:
|
अ.क्र.
|
नाव
|
श्रेणी
|
|
1
|
बलजित कौर
|
भूमीवरील साहस (Land Adventure)
|
|
2
|
श्री स्कॅलझांग रिग्झिन
|
भूमीवरील साहस (Land Adventure)
|
|
3
|
श्री रिमो साहा
|
जल साहस (Water Adventure)
|
|
4
|
श्री शिव प्रसाद चमोली
|
जीवनगौरव पुरस्कार (Life Time Achievement)
|
या पुरस्कारार्थींना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 सोहळ्यासोबत राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. प्रत्येक पुरस्कारार्थीला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात येईल. राष्ट्रीय निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. समितीने प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांची सखोल छाननी व मूल्यमापन करून, या राष्ट्रीय सन्मानासाठी संबंधित पुरस्कारार्थींच्या नावांची शिफारस केली.
या पुरस्कारांचा उद्देश युवकांमध्ये धैर्य, सहनशक्ती, शिस्त, जोखीम पत्करण्याची तयारी आणि सहकार्याची भावना विकसित करण्यासोबतच, आव्हानात्मक परिस्थितीत जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे हा आहे.
या पुरस्कारांमुळे देशभरातील युवकांना साहसी उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते. साहसी उपक्रमांना चालना देण्यासोबतच युवकांमध्ये धैर्य, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे हे पुरस्कार प्रतीक आहेत.
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306165)
अभ्यागत कक्ष : 6