पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा उझबेकिस्तानचा राजकीय दौरा: प्रमुख निष्पत्तींची यादी
Posted On:
30 AUG 2026 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
सामंजस्य करार आणि करार
|
अ.क्र.
|
शीर्षक
|
|
1.
|
भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात 2026-30 या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम.
|
|
2.
|
उझबेकिस्तानमधील तेर्मेझ येथे असलेल्या फयाज तेपा आणि कारा तेपा या प्राचीन बौद्ध स्थळांच्या संवर्धन आणि पुनर्स्थापनेसाठी भारत प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या सांस्कृतिक वारसा संस्थेदरम्यान इरादापत्र.
|
|
3.
|
भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अभिलेखागार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील उझआर्काइव्ह संस्था यांच्यात अभिलेखागार क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार.
|
|
4.
|
आयुर्वेद आणि इतर पारंपरिक वैद्यकीय पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात सामंजस्य करार.
|
|
5.
|
भूविज्ञान आणि खनिज संसाधने या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या खाण मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या खाण उद्योग व भूविज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.
|
|
6.
|
2026-28 या कालावधीसाठी पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या पर्यटन मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या पर्यटन समिती यांच्यात भागीदारी कार्यक्रम.
|
|
7.
|
भारत प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्थे आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या जागतिक अर्थव्यवस्था आणि कूटनीती विद्यापीठातील राजनैतिक अकादमी यांच्यात सामंजस्य करार.
|
|
8.
|
आर्थिक आणि वित्तीय संवादासाठी भारत प्रजासत्ताकाच्या अर्थ मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या अर्थव्यवस्था व वित्त मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.
|
|
9.
|
पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताकाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या पर्यावरणशास्त्र व हवामान बदल राष्ट्रीय समिती यांच्यात करार.
|
|
10.
|
उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत प्रजासत्ताक सरकार आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताक सरकार यांच्यात सामंजस्य करार.
|
|
11.
|
भागीदारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रजासत्ताकातील गुजरात राज्य आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकातील समरकंद प्रदेश यांच्यात सहकार्य करार.
|
घोषणा
|
अ.क्र.
|
शीर्षक
|
|
1.
|
भारत-उझबेकिस्तान धोरणात्मक भागीदारीचे व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये उन्नतीकरण.
|
|
2.
|
अरल समुद्र परिसरात वनीकरणासाठी अमेरिकन डॉलर 1 दशलक्षची मदत.
|
|
3.
|
हिंदी भाषेसाठी लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती (100 शिष्यवृत्ती).
|
|
4.
|
ताश्कंद राज्य प्राच्यविद्या विद्यापीठात आयसीसीआर संस्कृत अध्यासनाची स्थापना.
|
|
5.
|
उझबेकिस्तानमध्ये व्यापारी देयके करण्यासाठी भारतातील यूपीआय अॅप्सना राष्ट्रीय क्यूआर -यूझेडक्यूआर स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट लिमीटेड (एनआयपीएल) आणि उझबेकिस्तानमधील नॅशनल इंटरबॅंक प्रोसेसिंग सेंटर जेएससी (एनआयपीसी) यांच्यात व्यावसायिक करार.
|
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304752)
अभ्यागत कक्ष : 9