पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
कॉम्प्रेस्ड बायो गॅसच्या (सीबीजी) सुधारित किमतींमुळे ग्राहकांवर कोणताही मोठा आर्थिक बोजा न पडता उत्पादकांना चांगला नफा मिळत आहे.
Posted On:
29 AUG 2026 10:56AM by PIB Mumbai
वृत्तपत्रात अलीकडेच छापून आलेल्या एका लेखानुसार, 'गोबरधन' योजनेअंतर्गत 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस'च्या (सीबीजी) सुधारित दरांमुळे सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांवर मोठा अतिरिक्त बोजा पडू शकतो.
मात्र हा निष्कर्ष काही निवडक आणि विसंगत गृहितकांवर आधारित असून, तो वस्तुस्थिती दर्शवत नाही.
· विद्यमान व्यवस्थेनुसार, सीबीजी उत्पादकांना दिला जाणारा भाव हा सीएनजीच्या किरकोळ विक्री किंमतीच्या 85% शी निगडीत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, ही किंमत साधारणपणे 1,478 रुपये प्रति एमएमबीटीयू (Metric Million British Thermal Unit) इतकी होते.
· गोबरधन योजनेअंतर्गत, सीबीजीची किंमत 2,110 रुपये प्रति एमएमबीटीयू इतकी निश्चित करण्यात आली आहे.
· प्रति एमएमबीटीयू 1,478 रुपयांवरून 2,110 रुपये इतकी वाढ ही अंदाजे 43% इतकी आहे.
· ही सीबीजी उत्पादकांना दिली जाणारी खरेदी किंमत आहे. ही सीएनजी किंवा घरगुती पीएनजी ग्राहकांकडून थेट दिली जाणारी किंमत नाही.
· 2,110 रुपये प्रति एमएमबीटीयू ही संपूर्ण किंमत गॅस ग्राहकांद्वारे वसूल केली जाणार नाही. परवडण्याजोगी किंमत राखण्यासाठी सरकार सीबीजी साठी प्रति किलो 10 रुपये इतके आर्थिक सहाय्य प्रदान करेल; जे, 95 % मिथेन वायु असलेल्या सीबीजीच्या प्रति एमएमबीटीयू सुमारे 215 रुपयांच्या समतुल्य असेल.
· हे अर्थसहाय्य सरकारकडून पुरवण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत ते ग्राहकांकडून वसूल करण्यात येणार नाही. त्यामुळे, गॅस ग्राहकांच्या मोठ्या समूहाकडून वसूल केल्या जाणाऱ्या सीबीजीची प्रभावी किंमत खालीलप्रमाणे असेल : 2,110 रुपये प्रति एमएमबीटीयू (वजा) 215 रुपये प्रति एमएमबीटीयू = अंदाजे 1,895 रुपये प्रति एमएमबीटीयू
· सध्या असलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या (CBG) किमतीशी तुलना करता ही वाढ अंदाजे 28% आहे.
· याशिवाय, सीबीजी शहरी गॅस वितरण संस्थांना (CGD) त्यांच्या खरेदीच्या किंमतीवर विकला जात नाही. हे मूल्य, इतर देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमतीत एकत्रित केले जाते आणि त्याचा खर्च संबंधित देशांतर्गत वायूच्या एकत्रित साठ्यावर (पूलवर) विभागला जातो.
· यापूर्वी, सीबीजीचा खर्च केवळ सीएनजी (वाहतूक) आणि पीएनजी (घरगुती) क्षेत्रांसाठी वाटप केलेल्या मर्यादित प्रमाणात एपीएम (APM) गॅसवर विभागला जात असे. नवीन आराखड्यानुसार, सीबीजीची निव्वळ किंमत अशा घरगुती गॅसच्या आधारभूत साठ्यावर (base) विभागली जाईल, जी, पूर्वीच्या आधारभूत साठयाच्या तुलनेत अंदाजे 2.5 ते 3 पट जास्त असेल.
· सीबीजीचा खर्च गॅसच्या एका मोठ्या साठ्यावर विभागला जाणार असल्यामुळे, वैयक्तिक गॅस ग्राहकावर होणारा किमतीचा परिणाम नगण्य असेल.
सुधारित दररचना दोन उद्दिष्टांमध्ये संतुलन साधण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. एक म्हणजे, सीबीजी उत्पादकांना एक स्थिर आणि व्यवहार्य किंमत मिळते, ज्यामुळे संयंत्रांना शाश्वतपणे आणि अव्याहतपणे कार्यरत राहू शकतात, आणि दुसरे उद्दिष्ट म्हणजे, सरकारकडून, आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर असे आर्थिक पाठबळ मिळते, जे, मोठ्या प्रमाणावरील गॅस पूल ग्राहकांना कोणत्याही मोठ्या दरवाढीच्या परिणामापासून संरक्षण देतात.
***
नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2304477)
अभ्यागत कक्ष : 10