गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'जागतिक संस्कृत दिना'निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या



भारताची ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि चेतनेचा पाया असलेली संस्कृत भाषा जेवढी प्राचीन आहे तेवढीच ती वैज्ञानिकही आहे

संस्कृत भाषेतील वेद, उपनिषदे आणि शास्त्रे शतकानुशतके मानवतेला ज्ञानाच्या मार्गावर दिशादर्शन करत आहेत

संस्कृत भाषेचे जतन करण्यात आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यात असाधारण योगदान देणारे सर्व विद्वान आणि शिक्षकांना मी अभिवादन करतो

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्रावण पौर्णिमेनिमित्त देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 28 AUG 2026 12:09PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'जागतिक संस्कृत दिना'निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताची ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि चेतनेचा पाया असलेली संस्कृत भाषा जेवढी प्राचीन आहे तेवढीच ती वैज्ञानिक आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी X व्यासपीठावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संस्कृत भाषेत लिहिलेले वेद, उपनिषदे आणि शास्त्रे शतकानुशतके मानवतेला ज्ञानाच्या मार्गावर दिशादर्शन करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. संस्कृत भाषेचे जतन करण्यात आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यात असाधारण योगदान देणारे सर्व विद्वान आणि शिक्षकांना मी अभिवादन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्रावण पौर्णिमेनिमित्त देशातील जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

***

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304295) अभ्यागत कक्ष : 12