गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री नारायण गुरू जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली


अमित शाह यांनी महात्मा अय्यनकाली जी यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

श्री नारायण गुरू जी यांनी अध्यात्माच्या माध्यमातून अधिक सुसंवादी, न्याय्य आणि कल्याणकारी समाज घडवण्याचा मार्ग दाखवला

ज्ञान, करुणा, समता आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याची त्यांची तत्त्वे भारताच्या महानतेच्या मार्गावर आपल्याला सतत प्रेरणा देत राहतात

अय्यनकाली जी हे केरळमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा पाया घालणारे एक आद्य समाजसुधारक होते

Posted On: 28 AUG 2026 12:05PM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री नारायण गुरू जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.  अमित शाह यांनी महात्मा अय्यनकाली जी यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी श्री नारायण गुरू जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. श्री अमित शाह यांनी महात्मा अय्यनकाली जी यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

एक्स या समाजमाध्यम मंचावरील आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले, "श्री नारायण गुरू जी यांनी अध्यात्माच्या माध्यमातून अधिक सुसंवादी, न्याय्य आणि कल्याणकारी समाज घडवण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे ज्ञान, करुणा, समता आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याची तत्त्वे भारताच्या महानतेच्या मार्गावर आपल्याला सतत प्रेरणा देत राहतात. या महान द्रष्ट्याला त्यांच्या जयंतीनिमित्त माझे आदरपूर्वक प्रणाम.

आणखी एका पोस्टमध्ये  अमित शाह म्हणाले, "महान ऋषी महात्मा अय्यनकाली जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो. अय्यनकाली जी हे एक आद्य समाजसुधारक होते ज्यांनी केरळमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. त्यांनी सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचा पुरस्कार करत एका संघटित आणि मजबूत समाजाची पायाभरणीही केली. त्यांची मूल्ये प्रगतीच्या शिखराकडे जाणाऱ्या आपल्या मार्गावर सतत मार्गदर्शन करत राहतील."

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304239) अभ्यागत कक्ष : 5