संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराच्या क्षेत्रीय लष्कर दलातर्फे ‘टेरियर सायबर क्वेस्ट 2026’ चा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2026 11:13AM by PIB Mumbai
भारतीय लष्कराच्या क्षेत्रीय लष्कर दलाने, सायबरपीस यांच्या सहकार्याने, ‘टेरियर सायबर क्वेस्ट 2026’ चा शुभारंभ केला आहे. हे एक राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन असून या माध्यमातून सुरक्षा आणि संरक्षण विषयक आधुनिक आव्हाने तसेच सायबर सुरक्षा आणि माहिती डोमेन संदर्भातील आव्हानांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करणे हा याचा उद्देश आहे.
या स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती असून यामध्ये शिक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रातील तसेच सशस्त्र दलातील भारतातील तंत्रज्ञान कुशल प्रतिभावान व्यक्तीमत्वांना एकत्र आणण्याचा भारतीय लष्कराचा उद्देश आहे. या उपक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, धोका कमी करणे आणि डिजिटल जागरूकता यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात स्वदेशी उपाययोजना विकसित करायला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मागील आवृत्त्यांच्या धर्तीवर, टीसीक्यू 3.0 मध्ये तीन स्पर्धा ट्रॅकमध्ये आयोजित केली जाईल:
बग हंटिंग: हा एक सायबरसुरक्षेतील आव्हानात्मक उपक्रम आहे. याची सुरुवात ऑनलाइन 'कॅप्चर-द-फ्लॅग' (CTF) पात्रता फेरीने होईल आणि समारोप प्रत्यक्ष ठिकाणी ‘लाइव्ह सँडबॉक्स’ फेरीने होईल. सहभागींना महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या आभासी वातावरणातील असुरक्षितता ओळखून त्याचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक असेल.
एआय कवच: ही एआय आणि मशीन-लर्निंगवर आधारित स्पर्धा असून संरक्षण, भविष्यसूचक धोका गुप्तचर माहिती, स्वयंचलित संरक्षण यंत्रणा आणि विसंगती शोधणे यासाठी उपाययोजना विकसित करण्याच्या उद्देशाने तयार केली आहे.
क्रिएटर्स चॅलेंज: ही आशय निर्माते, कम्युनिकेटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यासाठी असलेली डिजिटल माध्यम आणि कथाकथन स्पर्धा असून डीपफेक, फिशिंग, ऑनलाइन घोटाळे आणि खोटी, भ्रामक माहिती यांसारख्या धोक्यांबाबत जनजागृती करणाऱ्या प्रभावी आणि परिणामकारक मोहिमा यांचा यात समावेश आहे.
या स्पर्धेसाठी नोंदणीकरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे. 1 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईन शॉर्टलिस्टिंग फेरी आयोजित केली जाईल. त्यानंतर महाअंतिम फेरी 6 ते 8 ऑक्टोबर 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होईल. पुरस्कार वितरण समारंभ 9 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
***
नितीन फुल्लुके / भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301862)
आगंतुक पटल : 8