युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर केले

प्रविष्टि तिथि: 18 AUG 2026 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026

क्रीडापटूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे, सरकारने विविध श्रेणींमध्ये खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार 2025

'क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा अर्जुन पुरस्कार', गेल्या चार वर्षांच्या कालावधीतील चांगली कामगिरी,  नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि अनुशासन या आधारे खेळाडूंना प्रदान केला जातो.
अर्जुन पुरस्कार 2025 घोषित झालेल्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचा समावेश आहे.

 

क्र 

क्रीडापटूचे नाव 

क्रीडाप्रकार 

1.

तेजस्विन शंकर

एथलेटिक्स

2.

मुहम्मद अजमल वी

एथलेटिक्स

3.

प्रियंका गोस्वामी

एथलेटिक्स

4.

त्रिशा जॉली

बॅडमिंटन 

5.

पुल्लेला गायत्री गोपीचंद

बॅडमिंटन 

6.

नरेन्द्र

मुष्टियुद्ध 

7.

विदित संतोष गुजराती

बुद्धिबळ 

8.

दिव्या जितेंद्र देशमुख

बुद्धिबळ 

9.

धनुष श्रीकांत

नेमबाजी (कर्णबधीर व्यक्तींसाठी )

10.

लालरेमसियामी

हॉकी 

11.

राजकुमार पाल

हॉकी 

12.

सुरजीत

कबड्डी 

13.

पूजा

कबड्डी 

14.

रुद्रांश खंडेलवाल

पॅरा -नेमबाजी 

15.

एकता भायन

पॅरा एथलेटिक्स

16.

अरविंद सिंह

नौकानयन 

17.

अखिल शेरॉन 

नेमबाजी 

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) 2025

आपल्या कामगिरीद्वारे क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि सक्रिय क्रीडा कारकिर्दीतून निवृत्तीनंतरही खेळाच्या प्रसारासाठी योगदान  सुरूच ठेवणाऱ्या क्रीडापटूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)' प्रदान केला जातो.

 

क्र.

 नाव 

क्रीडाप्रकार 

1.

आय अरुमइनायागम

फुटबॉल

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार 2025

क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरीसाठी सक्षम करणाऱ्या  क्रीडा प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठीच्या 'द्रोणाचार्य पुरस्काराने' सन्मानित केले जाते.

यात नियमित श्रेणीत नेमबाज प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांचा समावेश आहे.

नियमित श्रेणी

 

क्र. 

Name of the Coach

Discipline

1.

परवीर सिंह

एथलेटिक्स

 

2.

छोटे लाल यादव

मुष्टियुद्ध 

3.

                 नेहा नंदकुमार चव्हाण

 

नेमबाजी 

 

 

जीवनगौरव

 

क्र.

प्रशिक्षकांचे नाव 

क्रीडाप्रकार 

1.

 धर्मेंद्र सिंह यादव

मुष्टियुद्ध 

2.

 वीरेन्दर कुमार

कुस्ती 

 

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025

क्रीडा क्षेत्राचा विकास आणि प्रसार यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्था (सार्वजनिक/खासगी) आणि बिगर सरकारी संस्थांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025 साठी आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

 

क्र.

संस्थेचे नाव 

1.

आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे

 

या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते आणि खेळाडू, प्रशिक्षक व संस्थांना एका समर्पित ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वतःहून अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली होती.

यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते. न्यायमूर्ती(निवृत्त) मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या अर्जांचा विचार केला. या समितीत नामांकित खेळाडू, क्रीडा पत्रकार आणि क्रीडा प्रशासक यांचा समावेश होता.

नितीन फुल्लुके/ सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2300818) आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Bengali , Bengali-TR , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam