पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स सदस्य देशांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची नवी दिल्लीत पर्यावरण कृती समुह आणि हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क समुहाच्या प्राधान्यक्रमाबाबत चर्चा

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2026 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

2026 मधील भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 17 ऑगस्ट 2026 रोजी पर्यावरण कृती समुह आणि हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क समुहाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे (एमओइएफसीसी) सचिव तन्मय कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण अफ्रिका आणि संयुक्त अरब अमीराती या ब्रिक्स सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

आपल्या बीजभाषणात अध्यक्ष म्हणाले की, गेल्या दोन दशकांमधे ब्रिक्स आघाडीचा आर्थिक बाबींपलीकडे विस्तार झाला आहे. ब्रिक्स आता वाढते प्रदूषण, जैवविविधतेची हानी तसेच जागतिक तापमानवाढ यासारख्या पर्यावरणासमोरील गंभीर आव्हानांबाबतचा दृष्टीकोन मांडणारा आणि याबाबतचा सतत वाढता प्रभाव असलेला समुह बनला आहे. ते म्हणाले, “आमची भागीदारी शाश्वत विकास, हवामान अनुकूलता आणि स्वीकार, नैसर्गिक स्रोतांची कार्यक्षमता तसेच चक्रिय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणीय प्रशासन या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारली आहे.”  

ब्रिक्स 2026 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक सहकार्य नागरिककेंद्रित असावे, यामध्ये मानवता प्रथम हा विचार असावा या दृष्टीकोनाचे मार्गदर्शन लाभले आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातील ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य व शाश्वततेसाठी काम’ या संकल्पनेतही हा दृष्टीकोन दिसून येतो. विकासाच्या ध्येयांसोबत पर्यावरणीय शाश्वततेचा समावेश या दृष्टीकोनानुसार भारत पर्यावरणविषयक कृती करत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.  

भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पर्यावरण कृती समुह आणि हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क समुह यांनी एकत्रितपणे परस्परांशी निगडीत असलेल्या चार प्राधान्यक्षेत्रांमधील सहकार्य वाढवले आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, जंगलातील वणव्यांचे व्यवस्थापन आणि आपत्ती लवचिकता, चक्रिय अर्थव्यवस्था आणि स्वीकार ही ती प्राधान्यक्षेत्रे आहेत.

अध्यक्ष म्हणाले की, या प्राधान्य क्षेत्रांमधून ब्रिक्स देशांसमोरील पर्यावरणीय आव्हाने आणि त्यांचा सामना करण्याची एकत्रित ताकद व हुशारी दिसून येते. हवामान लवचिकता, पर्यावरणाचे संवर्धन, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि शाश्वत विकास ही एकमेकांवर अवलंबून असलेली आव्हाने आहेत आणि त्यांचा सामना एकेकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे; हे सर्व सदस्य देशांनी एकमताने स्वीकारल्याचे दिसून आले.

भारताचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून सदस्य देशांमध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे 21 संकल्पना आधारित वाटाघाटी, 10 द्विपक्षीय चर्चा, 2 संकल्पना आधारित परिसंवाद आणि 2 तंत्रज्ञानविषयक वेबिनार्स झाले अशी माहिती देण्यात आली. एकत्रित धोरणाच्या अंमलबजावणीसाठीची असाधारण वचनबद्धता यातून प्रतिबिंबित होते. या वेगवान चर्चांचे फलित म्हणजे आजच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्राधान्यक्षेत्रांबाबत एकमत होईल.

आतापर्यंत झालेल्या एकत्रित चर्चा व परिसंवादातील सहकार्याची व परस्पर आदराची भावना आजच्या चर्चांमध्येही कायम असेल, असा विश्वास अध्यक्षांनी आपले भाषण संपवताना व्यक्त केला. उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होणार आहे.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा यशस्वी कार्यकाळ आणि भारताने परस्पर आदर, विश्वास कायम राखत  एकमताने निर्णय घेताना सफळ चर्चांमधून समोर आणलेला प्रत्येक पैलू याबद्दल आजच्या बैठकीत सहभागी झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी भारताचे अभिनंदन केले.  

 

* * *

नितीन फुल्लुके/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300397) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam