गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्य दिन 2026 निमित्त पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या 1057 जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2026 8:59AM by PIB Mumbai

स्वातंत्र्यदिन, 2026 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवा दलाच्या एकूण 1057 जणांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर झाली आहेत. तपशील पुढील प्रमाणे:

शौर्य पदक

शौर्य पदक (जीएम) हे जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करताना, किंवा गुन्हा रोखताना किंवा गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेले उल्लेखनीय धैर्य, यासाठी प्रदान केले जाते. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन, त्यामधील जोखमीचे योग्य मूल्यांकन केले जाते.

एकूण 301 शौर्य पदके (जीएम) जाहीर झाली असून, या 301 पदकांपैकी अनुक्रमे 272 पोलिस कर्मचारी आणि 29 अग्निशमन दलाच्या जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

301 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक, 197 नक्षलग्रस्त भागातील जवानांना, तर जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातील 51 जवान, ईशान्येकडील राज्यांमधील 12 आणि इतर भागातील 41 जवानांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रदान केले जात आहेत.

सेवा पदक

राष्ट्रपतींचे अती विशिष्ट सेवा पदक (पीएसएम) हे सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते, आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदक (एमएसएम) हे साधनसंपन्नता आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते.

एकूण 92 राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (पीएसएम) जाहीर झाली असून यात पोलीस सेवेतील 83, अग्निशमन सेवेतील 04,  नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील 03 आणि सुधारात्मक सेवेतील 02 जणांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एकूण 664 पदके (एमएसएम) जाहीर झाली असून यातील 606 पोलिस सेवेसाठी, 28 अग्निशमन सेवेसाठी, 18 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेसाठी आणि 12 सुधारात्मक सेवेसाठी आहेत. 

सेवेनुसार पदकांची श्रेणी

पदकाचे नाव

पोलीस सेवा

अग्निशमन सेवा

नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवा

सुधारात्मक सेवा

एकूण

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम)

(एकूण जाहीर पदके: 92)

 

 

83

04

03

02

92

गुणवत्तापूर्ण सेवा पदक (एमएसएम)

(एकूण जाहीर पदके: 664)

606

28

18

12

664

पदक विजेत्यांचे तपशील:

अनु क्र.

विषय 

पदक विजेत्यांची संख्या

परिशिष्ट

1

शौर्य पदक (जीएम)

301

सूची-I

2

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम)

92

सूची-II

3

गुणवत्तापूर्ण सेवा पदक (एमएसएम)

664

सूची-III

4

पदक विजेत्यांची राज्यनिहाय / दलनिहाय यादी

सूचीनुसार

सूची-IV

 

सूची-I पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सूची- II पाहण्यासाठी येथे क्लिक करा   

सूची- III पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सूची- IV पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in येथे उपलब्ध आहेत.

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299307) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , Bengali , Gujarati