महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे नागरिकांना भारतीय हातमाग उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नागरिकांना भारतीय हातमाग उत्पादने स्वीकारण्याचे आणि देशातील विणकर आणि कारागीरांचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.
'X'वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की, भारताचे हातमाग उत्पादन हे केवळ कापड नसून ती आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि लाखो विणकर कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने आपल्या आवडत्या हातमाग उत्पादनांचे व्हिडिओ शेअर करावेत आणि राष्ट्रीय हातमाग दिनाची लोकचळवळ आणखी व्यापक करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आजच्या दिवशी ‘व्होकल फॉर लोकल’ हा संकल्प सर्वांनी दृढ करावा, आणि भारतीय हातमाग उत्पादनांचा अवलंब करून आपल्या कारागिरांचा गौरव वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2296100)
आगंतुक पटल : 15