रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्त्यावरील दुचाकी रुग्णवाहिका

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

रस्त्यावरील दुचाकी रुग्णवाहिकांसाठी नियामक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रिय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या अधिसूचनेचा आराखडा जारी केला आहे.

दुचाकी रुग्णवाहिकांमुळे आपत्कालिन परिस्थितीत तत्काळ मदत मिळू शकेल आणि ग्रामीण व दुर्गम तसेच डोंगराळ भागात शेवटच्या टप्प्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवता येईल.

सध्या केंद्रिय मोटार वाहन नियमावलीअंतर्गत दुचाकी रुग्णवाहिकांसाठी वेगळी श्रेणी म्हणून कोणतीही नियमावली अस्तित्वात नाही. तसेच त्यांची बांधणी, कार्य सुरक्षितता, रुग्णसेवेची यंत्रणा, मंजूरी, नोंदणी आणि देखभाल दुरुस्ती यावर देखरेख ठेवणारी राष्ट्रीय प्रशासकीय यंत्रणाही नाही. एआयएस-209 (भाग 1) 2026 – जीवरक्षक दुचाकी रुग्णवाहिकांच्या निर्मिती व कार्यक्षमतेसाठीच्या गरजा या नियमाच्या आधारे कायद्यातील या त्रुटी दूर करण्याचा प्रस्ताव या सुधारणेत सुचवण्यात आला आहे.

  • उपयोगिता – 1 ऑक्टोबर 2027 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित झालेल्या एल 2 श्रेणीतील दुचाकी रुग्णवाहिका एआयएस209 (भाग 1) 2026 नियमाला अनुसरुन असाव्यात असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  • रुग्णवाहिकेवरील आपत्कालिन दिवे – 1 ऑक्टोबर 2027 पासून दुचाकी रुग्णवाहिकेवर बसवण्यात आलेले आपत्कालिन दिवे एआयएस209 (भाग 1) 2026 नियमानुसार असावेत असा प्रस्ताव आहे.
  • कामकाजाचे क्षेत्र – संबंधित राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी अशा रुग्णवाहिकांची नोंदणी करता येईल.
  • वाहन योग्यतेचे निकष – दुचाकी रुग्णवाहिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठीचे वाहन मानले जाईल आणि अशा वाहनांच्या योग्यतेचे निकष त्याला लागू असतील. दर दोन वर्षांनी या रुग्णवाहिकांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल.
  • समर्पित तपासणी – वाहन योग्यतेच्या तपासणीमध्ये रुग्णवाहिकेसाठीच्या साधनांची सुरक्षित जोडणी किंवा रुग्णाला नेणारी व्यवस्था, टायर्स व रिम्स, आपत्कालिन इशारा देणारे दिवे, रुग्णाची खाट व त्याची सुरक्षा यंत्रणा, रुग्णाला बांधून ठेवणारी यंत्रणा, रुग्णाला चढवण्या-उतरवण्याची यंत्रणा आणि उपलब्धता, आग विझवणाऱ्या साधनाची उपलब्धता व वैधता या सर्व निकषांची तपासणी केली जाईल.  

सुरक्षितता व कार्यक्षमता आराखडा : एआयएस – 209 (भाग 1) : 2026 नुसार दुचाकी रस्ते रुग्णवाहिका हे एल2 श्रेणीतील वाहन असेल आणि रुग्णवाहिका साधने किंवा रुग्णाला नेण्याची यंत्रणा अशा वाहनावर बसविलेली किंवा वाहनाला जोडलेली असेल. या रुग्णवाहिकांच्या मानकांमध्ये वाहनाची स्थिरता व ब्रेक कार्यक्षमता, वाहन उभे करण्यासाठीचे ब्रेक व श्रेणी क्षमता गरजा, मागील भागातील दृश्यमानता, जोडणीची एकसंधता, आपत्कालिन दृश्यमानता व इशारा यंत्रणा, रुग्णाला सुरक्षितरित्या वाहनात बसविणे, वातावरणापासून संरक्षण यासारख्या प्रमुख उत्पादन व कार्य सुरक्षितता घटकांचा समावेश आहे.

या प्रस्तावित सुधारणा आराखड्यामुळे दुचाकी रुग्णवाहिकांच्या आरेखनात व कामकाजात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व जबाबदारीचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे. यामुळे त्वरित आपत्कालिन प्रतिसादाला मदत मिळेल व जिथे पारंपरिक रुग्णवाहिकांना पोहोचण्यात अडचणी येतात अशा ठिकाणी आपत्कालिन वैद्यकीय मदत पोहोचेल.

या नियमावली आराखड्यावरील सूचना आराखडा जारी केल्यानंतर 30 दिवसांनी तपासून पाहिल्या जातील आणि त्यानंतर केंद्रिय मोटार वाहन कायदा 1989 (सीएमव्हीआर 1989) अंतर्गत नियमावली निश्चित केली जाईल.

नेहा कुलकर्णी/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2293830) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Kannada