उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी थोर स्वातंत्र्यसैनिक थिरू सुब्रमणिया सिवा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवन येथे थोर स्वातंत्र्यसैनिक थिरू सुब्रमणिया सिवा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले:
थोर स्वातंत्र्यसैनिक थिरू सुब्रमणिया सिवा हे तामिळनाडूच्या दक्षिणेकडील वटलगुंडू या छोट्याशा शहरातील होते. त्यांनी गावागावात प्रवास केला आणि वंदे मातरम या स्फूर्तिदायी घोषणेने लोकांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याप्रति असलेल्या त्यांच्या अढळ निष्ठेमुळे ब्रिटिशांच्या वसाहतवादी शासनाने त्यांना महान स्वंतंत्र्यसैनिक थिरू व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांच्या समवेत कारागृहात बंदी बनवले.
त्यांच्या बंदिवासाच्या काळात त्यांना कुष्ठरोगाचा संसर्ग झाला असला तरी त्यांनी आपला निर्धार कधीच ढळू दिला नाही आणि आपल्या अंतिम श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. भारताचा एक राष्ट्रभक्त सुपुत्र असलेल्या थिरू सुब्रमणिया सिवा यांनी भारतमातेला आपले दैवत मानले आणि आपल्या मायभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, राष्ट्र या महान देशभक्ताला आपला अथांग आदर आणि भावपूर्ण आदरांजली अर्पण करत आहे.
* * *
आशिष सांगळे /भक्ती सोनटक्के/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288276)
आगंतुक पटल : 13