पंतप्रधान कार्यालय
लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
23 JUL 2026 8:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपली संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी आणि बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच प्रेरणादायी होते,असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. त्यांच्या लेखनाने लोकांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण केला आणि राष्ट्राभिमानाची भावना वृध्दिंगत केली,असेही मोदींनी पुढे म्हटले आहे.
"आपल्या X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केले आहे:
"लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्यांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली. आपली संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी आणि बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच प्रेरणादायी होते. त्यांच्या लेखनाने लोकांना आत्मविश्वास दिला आणि अभिमानाची भावना वृध्दिंगत केली."
***
AshishSangle / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2288151)
अभ्यागत कक्ष : 48
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam