अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2026 पर्यंत युपीआय वापरकर्त्यांची संख्या 55.49 कोटीवर गेली


आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 24,162 कोटी आणि मूल्य 314 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2026 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,20 जुलै 2026

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस युपीआय  ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे चालवली जाणारी एक देय अर्थात पेमेंट प्रणाली आहे, जी 'पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स कायदा 2007 नुसार अधिकृत आहे.

एनपीसीआय ने माहिती दिली आहे की, जून 2026 पर्यंत युपीआय व्यासपीठावर 55.49 कोटी वापरकर्ते जोडले गेले होते. या युपीआय व्यवहारांची संख्या आणि मूल्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

गेल्या पाच आर्थिक वर्षांतील युपीआय व्यवहार :

Financial Year

Volume (in Crore)

Value (in lakh Crore)

FY 2021-22

4,595.61

84.16

FY 2022-23

8,371.44

139.15

FY 2023-24

13,112.95

199.95

FY 2024-25

18,586.60

260.56

FY 2025-26

24,161.69

314.23

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 24,162 कोटी आणि मूल्य 314 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले.

एनआयपीएल म्हणजेच इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड ही एनपीसीआय ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एप्रिल 2020 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा उद्देश परदेशी संस्थांशी भागीदारी करून युपीआय आणि रुपे कार्ड योजनांसारखे एनपीसीआय चे विविध पेमेंट प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेणे हा आहे. यामुळे भारतीय पर्यटक आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना सीमापार व्यवहार सहज पणे करणे शक्य होते; तसेच, भागीदार देश आणि संस्थांना त्यांची पेमेंट पायाभूत सुविधा (उदा. युपीआय सारख्या रिअल-टाइम पेमेंट प्रणाली किंवा रुपे सारख्या देशांतर्गत कार्ड योजना) उभारण्यास मदत मिळते.

युपीआय-आधारित व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार, आरबीआय आणि एनपीसीआय द्वारे वेळोवेळी विविध उपक्रम राबवले गेले आहेत.

पीटूपी म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरण आणि पीटूएम म्हणजेच व्यक्ती-ते-व्यापारी व्यवहार सुलभ करण्यासाठी युपीआय ला विविध देशांच्या पेमेंट प्रणालींशी जोडले गेले आहे.

Countries using UPI along with Partner institutions

Sl.

Country

Live for

Partner Institution

Live since

1

Bhutan

P2M

RMA Bhutan

July 2021

2

Singapore

P2M

NETS Singapore Pte. Ltd., HitPay Payment

Solutions Pte. Ltd., LiquidPay Group Pte. Ltd.

August 2021

3

UAE

P2M

Mashreq Bank PSC (NeoPay),

Network International

Magnati-Sole Proprietorship LLC

April 2022

4

Singapore

P2P

BCS Paynow

February 2023

5

France

P2M

LYRA Network

February 2024

6

Mauritius

P2M

Bank of Mauritius

February 2024

7

Sri Lanka

P2M

Lanka Pay Pvt. Ltd.

February 2024

8

Nepal

P2M

FonePay Payment Services Ltd.

March 2024

9

Qatar

P2M

Qatar National Bank

September 2025

10

Greece

P2P

Eurobank S.A.

May 2026

11

Nepal

P2P

Nepal Clearing House Limited (NCHL)

June 2026

12

Cambodia

P2M

Acleda Bank PLC

June 2026

ही माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.


राधिका अघोर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2286743) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada