पंतप्रधान कार्यालय
37 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
19 JUL 2026 7:11PM by PIB Mumbai
लिथुआनियातील विल्नियस इथं आयोजित 37 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. यामध्ये सुवर्ण पदकासह चारही सदस्यांनी पदके जिंकली आहेत. मोदींनी भव्या गुनवाल, सौमिल मैती, निशित कलानी आणि अनमोल कुमार यांनी आण्विक जीवशास्त्र, जैवरसायन शास्त्र, वर्गीकरणशास्त्र आणि वनस्पती संगणकीय जीवशास्त्र या विषयांमधील सखोल ज्ञानाचे प्रदर्शन केले असल्याचे म्हटले आहे, आणि त्यांच्या यशामुळे विविध तरुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात नमूद केले आहे की,
लिथुआनियातील विल्नियस इथं आयोजित 37 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सर्व चार भारतीय खेळाडूंच्या संघ सदस्यांनी एका सुवर्णपदकासह पदके मिळवली आहेत, ही बाब निश्चितच आनंदाची आहे.
भव्या गुणवाल, सौमिल मैती, निशित कलानी आणि अनमोल कुमार यांच्या ऑलिम्पियाडमधील यशाबद्दल अभिमान वाटतो. त्यांनी आण्विक जीवशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र, प्राणी शरीरक्रियाविज्ञान, प्राणी आकारविज्ञान आणि वर्गीकरणशास्त्र तसेच वनस्पती संगणकीय जीवशास्त्र यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञानाचे प्रदर्शन केले आहे.
त्यांच्या यशामुळे विविध तरुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, अशी खात्री मला वाटते.
***
माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2286371)
अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati