सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह 19 जुलै रोजी कोलकाता येथे जगातील सर्वांत मोठ्या दही उत्पादन प्रकल्पाचे करणार भूमिपूजन


सुमारे 700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभे राहणाऱ्या अमूल बंगाल डेअरी प्रकल्पात दररोज 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया होणार; तर 10 लाख किलो दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन होणार,

या प्रकल्पाचा पश्चिम बंगालमधील सव्वा लाखांहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असून,  त्यात 30 हजारांहून अधिक महिला दूध उत्पादकांचाही समावेश

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2026 7:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धी या संकल्पनेला आणि श्वेत क्रांती 2.0 च्या उद्दिष्टांना पुढे नेत, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह 19 जुलै 2026 रोजी कोलकाता येथील न्यू टाउन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अमूल बंगाल डेअरी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या दही उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, तसेच विविध मान्यवर आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम बंगालमधील हावडा फूड पार्कमध्ये अमूलकडून सुमारे 700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अमूल बंगाल डेअरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता यात असेल. तसेच, दररोज सुमारे एक हजार मेट्रिक टन, म्हणजेच 10 लाख किलो दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करण्याची क्षमता या प्रकल्पात असेल.

अमूल बंगाल डेअरी प्रकल्पामुळे पश्चिम बंगालमधील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात आधुनिक प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुविधा विस्तारल्या जातील. या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगली आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळेल. राज्यातील दुग्ध सहकारी संस्थांना बळकटी देत हा प्रकल्प बंगालमधील धवल क्रांतीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.

या कार्यक्रमादरम्यान, भारत टॅक्सी आणि पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्यात राज्यातील वाहतूक सेवा चालविणे आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी सामंजस्य कराराची देवाणघेवाणही करण्यात येईल.

या कार्यक्रमादरम्यान अमित शाह 10 जिल्ह्यांमध्ये एकूण 1,400 मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या 14 साठवण गोदामांचे भूमिपूजन करतील. ही गोदामे अंदाजे 5.98 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहेत. याशिवाय, दक्षिण 24 परगणा आणि कूचबिहार येथे प्रत्येकी 100 मेट्रिक टन क्षमतेची दोन गोदामे, जी एकूण 73.61 लाख रुपये खर्चून उभारण्यात आली आहेत, त्यांचे उद्घाटनही शाह करतील.

***

राधिका अघोर/राज दळेकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2286201) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Kannada