पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढ निश्चय आणि सकारात्मक विचाराची ताकद अधोरेखीत करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2026 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,9 जुलै 2026
दृढ विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटले आहे. देशातील युवा वर्ग याच गुणांच्या बळावर पूर्ण समर्पण भावनेने विकसित भारताचा संकल्प साकार करण्याच्या दिशेने काम करत असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सामायिक केलेले एक संस्कृत सुभाषित -
अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम्।
अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः॥
उत्साह, दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हाच कोणत्याही प्रगतीचा पाया असतो असा या सुभाषिताचा अर्थ आहे. जी व्यक्ती निराश न होता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहते, अखेरीस तीच व्यक्ती यश मिळवते. त्यामुळेच प्रत्येकाने दृढ विश्वास आणि समर्पण भावनेने काम करत राहिले पाहिजे, कारण हेच गुण माणसाला जीवनात प्रगती, यश आणि उत्कृष्टतेच्या दिशेने घेऊन जातात असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश -
दृढ़ विश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आपले युवा सहकारी याच गुणांच्या बळावर पूर्ण समर्पण भावनेने विकसित भारताच्या जडणघडणीचे काम करत आहेत.
अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम्।
अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः॥
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283098)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam