पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकातील कारवार इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 09 JUL 2026 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जुलै 2026

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबांप्रती आपल्या सहवेदना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी  प्रार्थना त्यांनी  केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश -

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार इथली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना शोककुल कुटुंबांसोबत आहेत. अपघातातील जखमी  लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो : पंतप्रधान @narendramodi

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2282947) अभ्यागत कक्ष : 48