आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने औषधे नियम 1945 अंतर्गत नवी मुंबई विमानतळाला औषधांच्या आयातीसाठी बंदर म्हणून केले अधिसूचित


नवी मुंबई विमानतळाद्वारे औषधांची आयात सुलभ करण्यासाठी नियम 43अ मध्ये सुधारणा

औषधांच्या आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बंदरांची एकूण संख्या 42 वर पोहोचली, औषधे क्षेत्रातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार सुलभतेला बळ

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2026 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2026

 

औषध पुरवठा साखळी बळकट करण्याच्या आणि व्यापारास सुलभता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात अलीकडेच उदघाटन झालेल्या नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी दिली आहे.

औषधे नियम 1945 च्या नियम 43अ मधील सुधारणेनुसार, देशात औषधे आयात करता येऊ शकणाऱ्या  विमानतळांच्या यादीत आता नवी मुंबईचाही समावेश करण्यात आला आहे.  औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1940 च्या तरतुदींअंतर्गत औषधे तांत्रिक सल्लागार मंडळाशी सल्लामसलत केल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी :  https://egazette.gov.in/WriteReadData/2026/274223.pdf)

या सुधारणेसोबतच  औषध नियम1945 अंतर्गत औषध आयातीसाठी अधिकृत असलेल्या  विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश  झाला आहे. यामुळे (रस्ते, रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्गांसह) प्रवेशबंदरांची एकूण संख्या 42 झाली आहे. या सुधारणेमुळे औषधांशी संबंधित मालवाहतूक अधिक सुलभ होईल, लॉजिस्टिक पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील आणि आयातदारांना औषध आयातीसाठी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

हे पाऊल,  नियामक चौकट बळकट करणे, व्यापार सुलभता वाढवणे आणि व्यवसाय सुलभतेला चालना देणे, तसेच आयात होणाऱ्या औषधांवर प्रभावी नियामक देखरेख ठेवणे,  यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2282459) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu