ग्रामीण विकास मंत्रालय
शिवराज सिंह चौहान यांनी व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता केला वितरित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्हीबी-जी-राम-जी योजना देशभरात एकाच दिवसात यशस्वीरित्या आणि सुरळीतपणे राबविण्यात आली: शिवराज सिंह चौहान
कोणत्याही राज्यात मजुरीचा दर प्रतिदिन 300 रुपयांपेक्षा पेक्षा कमी नसेल; वेळेवर मजुरी देणे, पारदर्शकता आणि दर्जेदार मालमत्ता यावर सरकारचा विशेष भर
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2026 1:03PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण विकास मंत्र्यांसोबत विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) [VB-G-RAM-G] च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान, त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला.

सरकारने 1 जुलै 2026 पासून देशभरात व्हीबी-जी-राम-जी योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय लागू करण्याचा निर्धार केला आहे, असे बैठकीला संबोधित करताना चौहान यांनी सांगितले. ही योजना देशभरात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे आणि मनरेगा (MGNREGA) मधून व्हीबी-जी-राम-जी मध्ये झालेले संक्रमण सुरळीत आणि अखंडितपणे झाले आहे, हे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत कोणतीही तांत्रिक किंवा कार्यान्वयन समस्या नोंदवली गेलेली नाही, हे त्यांनी अधोरेखित केले.
4LRT.jpeg)
WND1.jpeg)

***
श्रद्धा मुखेडकर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2281278)
आगंतुक पटल : 49