ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (पीएमजीकेएवाय) माध्यमातून सुधारित दर्जाच्या तांदळाच्या पुरवठ्याला सरकारची मंजुरी; 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळणार
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2026 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2026
पंतप्रधान गरीब कल्याण योजना (पीएमजीकेएवाय)तसेच इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या तांदळाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्तावित महत्त्वपूर्ण सुधारणेला आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने (सीसीईए) मंजुरी दिली आहे.
गेल्या सुमारे तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतून वितरीत होणाऱ्या तांदळाच्या गुणवत्ताविषयक तपशिलांचा आढावा घेतला आहे. याद्वारे, लाभार्थ्यांना त्यांचे विद्यमान हक्क अबाधित राखून, कणीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी असलेला तांदूळ मिळण्याची सुनिश्चिती झाली आहे.
सुधारित धोरणाच्या अंतर्गत:
- पीएमजीकेएवाय अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तांदळामध्ये कणीचे प्रमाण 10% पर्यंत असेल; सध्या हे प्रमाण 25%आहे.
- उकडा तांदळामध्ये नवीन सुधारणेनुसार आता 5% कणी असलेला तांदूळ वितरीत होणार आहे. सध्या हे प्रमाण 16% आहे.
सुधारित दर्जाच्या तांदळाची खरेदी लगेचच सुरु होईल आणि खरीप विपणन हंगाम 2027-28 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व खरेदीदार राज्यांमध्ये या तांदळाचा पुरवठा सुरु करण्यात येईल.
देशातील सर्व राज्यांमध्ये सुधारित निकषांच्या दिशेने सुलभ स्थित्यंतर सुनिश्चित करत, पीएमजीकेएवाय तसेच इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत सुधारित दर्जाच्या तांदळाचे वितरण देखील टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येईल.
सदर निर्णयातून अन्न सुरक्षेची सुनिश्चिती करण्यासोबतच पीएमजीकेएवाय तसेच इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा दर्जा सुधारण्याप्रती सरकारच्या बांधिलकीचे दर्शन घडते. लाभार्थ्यांसाठी मंजूर धान्याच्या प्रमाणात कोणताही बदल न करता, त्यांना अखंड दाणे असलेला, चांगल्या प्रतीचा, दिसायला चांगला आणि ग्राहकांच्या पसंतीला अधिक उतरणारा तांदूळ मिळेल.
सुधारित निकषांनुसार, तांदूळ भरडण्याच्या क्रियेतून निर्माण होणारी कणी वेगळी काढली जाईल आणि ती इतर उद्देशांसाठी उत्पादकपणे वापरली जाईल. यामुळे पीएमजीकेएवायमधून अधिक उत्कृष्ट दर्जाचा खाण्यायोग्य तांदूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती होईल.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280486)
आगंतुक पटल : 9