PIB Backgrounder
ई-सरस (eSARAS): बाजारपेठांचा विस्तार, ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2026 12:02PM by PIB Mumbai
| विणकर आणि कुंभारांपासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थांपर्यंत, ग्रामीण कारागीर भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या गाथेला चालना देत आहेत. 'ई-सरस' (eSARAS) मंचाच्या माध्यमातून, हजारो बचत गट राष्ट्रीय बाजारपेठा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक पाठबळ थेट मिळवत आहेत. मध्यस्थांचे उच्चाटन करून आणि प्रमुख व्यापार मंचाशी स्वतःला जोडून घेऊन, ई-सरस ग्रामीण हस्तकला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत आहे. देशभरातील विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये या मंचाचा होणारा विस्तार, ग्रामीण उपजीविकेतील त्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करतो. ई-सरससारखे उपक्रम महिला उद्योजकतेला चालना देण्यात, सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आणि डिजिटली सक्षम, स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. |
तळागाळातून परिवर्तनाची जडणघडण

गेल्या 11 वर्षांत, डिजिटल इंडिया कार्यक्रमाने शासनात आणि सार्वजनिक सेवा वितरणात परिवर्तन घडवून आणले आहे—त्यांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम बनवले आहे. हे परिवर्तन शहरांच्या पलीकडे ग्रामीण भारतात पोहोचले आहे, जिथे तंत्रज्ञान आता आर्थिक सक्षमीकरण, उपजीविका बळकटीकरण आणि समुदाय-नेतृत्वातील उद्योजकतेचे एक साधन बनले आहे.
या पार्श्वभूमीवर, ई-सरस (SARAS Aajeevika) हा अत्यंत महत्त्वाचा परिणाम म्हणून उदयाला आला आहे. दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत (DAY-NRLM) ग्रामीण विकास मंत्रालयाने हा मंचा विकसित केला आहे. डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर तळागाळातील आर्थिक परिवर्तनासाठी कसा केला जाऊ शकतो, याचे हे एक ठळक उदाहरण आहे.
ई-सरस म्हणजे काय?
ई-सरस ही DAY-NRLM ची अधिकृत ऑनलाइन बाजारपेठ आहे, जी केवळ महिला बचत गट आणि त्यांच्या महासंघांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी तयार केलेली आहे. उत्कृष्टपणे निवडलेल्या या हस्तकलेच्या वस्तू देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून येतात—ज्यामध्ये मध्य प्रदेशातील चंदेरी साड्यांचे विणकर, राजस्थानमधील संगमरवरी वस्तूंचे कारागीर, तसेच जम्मू आणि काश्मीरच्या टेकड्यांमध्ये राहणारे पश्मिना उत्पादक यांचा समावेश आहे. ई-सरसवरील प्रत्येक उत्पादनामागे एक कहाणी आहे आणि खरेदी केली जाणारी प्रत्येक वस्तू ग्राहकाला थेट त्या वस्तूच्या कारागिरासोबत जोडते.
हा मंच खालील प्रमुख श्रेणींमध्ये स्थानिक उत्पादनांना सूचीबद्ध करतो:
- गृह आणि जीवनशैली
- महिलांचे तयार कपडे आणि पोशाखाशी संबंधित वस्तू
- पुरुषांचे तयार कपडे आणि पोशाखाशी संबंधित वस्तू
- वैयक्तिक काळजी
- अन्नपदार्थ
- लहान मुलांची खेळणी आणि संबंधित वस्तू
8.62 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गट सदस्यांना ई-सरसच्या माध्यमातून ऑनलाइन दुकान मिळाले आहे, ज्यापैकी 85% सदस्य थेट ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत (फेब्रुवारी 2024 पर्यंत). हे त्यांना केवळ एक बाजारपेठच उपलब्ध करून देत नाही, तर विपणन , ब्रँडिंग आणि लॉजिस्टिक्ससाठी संस्थात्मक पाठबळही देते.
| DAY-NRLM ची देशभरातील 7,627 तालुक्यांमध्ये व्याप्ती आहे आणि तळागाळातील या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी या अभियानाने 1.51 कोटी समुदाय सदस्यांचे एक संघटन तयार केले आहे. |

पोर्टल ते ई-कॉमर्स इकोसिस्टम: महत्त्वाचे टप्पे
काही वर्षांपूर्वी एका साध्या वेब पोर्टलच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाचे रूपांतर आता एका पूर्ण-क्षमता असलेल्या ई-कॉमर्स परिसंस्थेत झाले आहे. यामध्ये आता मोबाईल ऍप, प्रत्यक्ष गॅलरी, राष्ट्रीय मेळे, लॉजिस्टिक्स फुलफिलमेंट सेंटर आणि भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म्ससोबतच्या एकत्रीकरणाचा समावेश आहे.
|
मंचाची वाटचाल
|
तपशील
|
|
ई-सरस पोर्टलचा प्रारंभ
|
सरस उत्पादनांच्या अधिक चांगल्या आणि प्रभावी विपणनासाठी https://www.esaras.in/ हे ई-कॉमर्स पोर्टल सुरू करण्यात आले.
|
|
ई-सरस मोबाईल अॅपचा प्रारंभ
|
ई-सरस फुलफिलमेंट सेंटरसोबतच मोबाईल अॅप देखील लाँच करण्यात आले. याचा उपयोग उत्पादनांची प्रक्रिया, पॅकेजिंग आणि शिपिंग (वाहतूक) करण्यासाठी केला जातो.
|
|
ओएनडीसी
|
बचत गटांची उत्पादने 11 पेक्षा जास्त बायर अॅप्सवर (ओएनडीसी मंचावरील 20 कोटींहून अधिक खरेदीदारांसाठी) उपलब्ध करण्यात आली असून, यामध्ये 800 पेक्षा जास्त हस्तकला उत्पादनांची नोंदणी झाली आहे.
|
|
उमंग
|
ई-सरसची उमंग (UMANG) अॅपवर नोंदणी झाली आहे; हा मंच आता 796.69 कोटी व्यवहारांसह 2,572 सेवा प्रदान करत आहे (जून 2026 पर्यंत).
|
|
सरस शक्ती कलेक्शन
|
संस्थात्मक आणि कॉर्पोरेट बाजारपेठेसाठी 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026' मध्ये उत्कृष्टपणे निवडलेल्या प्रीमियम भेटवस्तूंचा संग्रह लाँच करण्यात आले.
|
|
सरस आजीविका गॅलरी
|
नवी दिल्लीतील बाबा खडक सिंग मार्ग येथे कायमस्वरूपी रिटेल गॅलरीची स्थापना करण्यात आली आहे, जिथे बचत गटांची निवडक उत्पादने प्रदर्शित केली जातात.
|

पुढील वाटचाल: हस्तकला, व्यापार आणि समुदाय
ओएनडीसी, उमंग आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्ससोबतच्या वाढत्या जोडणीमुळे, ई-सरस ग्रामीण उत्पादकांना भारतातील हस्तकला वारशाचे जतन करत मोठ्या बाजारपेठांमध्ये स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवत आहे. जसजशी ही परिसंस्था अधिकाधिक विकसित होईल, तसतशी ती शाश्वत उपजीविका निर्माण करण्यात आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला गती देण्यात अधिक जास्त महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
असे करत असताना, डिजिटल इंडिया कशा प्रकारे महिलांचे सक्षमीकरण करत आहे, भारताचा समृद्ध हस्तकला वारसा जतन करत आहे आणि सर्वसमावेशक, महिला-नेतृत्वाखालील ग्रामीण विकासाला गती देत आहे, याचे ई-सरस हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
References
Ministry of Rural Development
https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3d69116f8b0140cdeb1f99a4d5096ffe4/uploads/2026/04/202604211510022943.pdf
https://sansad.in/getFile/loksabhaquestions/annex/184/AU2884_xtODlC.pdf?source=pqals
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2278288®=48&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1871641®=48&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1937055®=48&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2278288®=3&lang=1
Ministry of Electronics and Information Technology (MEITy)
https://en.vikaspedia.in/viewcontent/social-welfare/entrepreneurship/important-days/esaras-portal-for-handicrafts?lgn=en
https://negd.gov.in/
https://www.facebook.com/OfficialUmangApp/posts/to-promote-local-artisans-and-self-help-groups-esaras-on-umang-facilitates-citiz/1313461524124692/
Ministry of Commerce & Industry
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2146920&ref=official-press.com®=48&lang=2
PIB Archives
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2267960®=48&lang=2
https://www.pib.gov.in/PressNoteDetails.aspx?NoteId=159055&ModuleId=3®=48&lang=2
Click here for pdf file.
***
NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280222)
आगंतुक पटल : 8