गृह मंत्रालय
लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील उच्चस्तरीय समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली
Posted On:
01 JUL 2026 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2026
लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील उच्चस्तरीय समितीने केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
लोकसंख्याशास्त्रीय बदलांसंदर्भातील विविध विषयांवर अभिप्राय मिळवण्याच्या उद्देशाने थेट माहिती मिळवण्यासाठी देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट देणार असल्याची आणि विविध मंत्रालयांशी संवाद साधणार असल्याची माहिती, लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचा दौरा अर्थपूर्ण आणि परस्परसंवादी करण्याच्या दृष्टीने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून समर्पक माहिती मिळवण्यासाठी एक तपशीलवार प्रश्नावली तयार केली असलयाचे उच्चस्तरीय समितीने सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीने तयार केलेल्या कार्यनीतीचे कौतुक केले तसेच समितीच्या दैनंदिन कामकाजात आणि त्यांच्या दौऱ्यांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश गृहसचिवांना दिले. तसेच, उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल आणि शिफारशी शक्य तितक्या लवकर सादर कराव्यात, अशी सूचनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लोकसंख्याशास्त्र अभियानावरील उच्चस्तरीय समितीची घोषणा केली होती. केंद्र सरकारने अवैध स्थलांतर आणि इतर असाधारण कारणांमुळे उद्भवणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी आणि या लोकसंख्याशास्त्रीय बदलांना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.
न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नवलेकर (निवृत्त) हे समितीचे अध्यक्ष आहेत. जनगणना आयुक्तांव्यतिरिक्त, दुर्गा शंकर मिश्रा (निवृत्त आयएएस), बालाजी श्रीवास्तव (निवृत्त आयपीएस) आणि डॉ. शमिका रवी (पीएमईएसीच्या सदस्या) हे मान्यवर या उच्चस्तरीय समितीचे सदस्य आहेत.
ही उच्चस्तरीय समिती अवैध स्थलांतर आणि इतर असामान्य कारणांमुळे देशाच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करेल, त्यांच्या कारणांचे विश्लेषण करेल आणि योग्य धोरणात्मक, कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजनांची शिफारस करेल.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2280165)
अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein:
English
,
हिन्दी
,
Punjabi
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam