राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींची आंध्र प्रदेशातील पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (30 जून 2026) आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील 'सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश'चा पहिला दीक्षांत समारंभ पार पडला.

सर्व विद्यापीठांनी, विशेषतः आदिवासी विद्यापीठांनी आदिवासी लोकांकरिता उदरनिर्वाहाची अधिक साधने उपलब्ध व्हावीत यासाठी वन्य उत्पादने, हस्तकला, भरडधान्ये, औषधी वनस्पती, पर्यावरण-पर्यटन आणि स्थानिक उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत उत्पादक कामांना चालना मिळू शकेल अशा नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्याची गरज, राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, हा पदवीदान समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा आनंद साजरा करण्याचा दिवस असला, तरी तो विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याच्या दृष्टीने एखादा संकल्प करण्यास प्रेरित करणारा देखील क्षण असतो. वेगाने बदलत असलेल्या वातावरणात आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाच्या नवनवीन संधींवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ पुस्तकी शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता, व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या वातावरणातूनही शिकणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय, विद्यार्थ्यांनी आपला समाज, संस्कृती आणि परंपरांशी जोडलेले राहून समाज आणि राष्ट्राचे भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

आपल्या वेगाने विकसित होत असलेल्या देशात, आपल्या वारशाशी जोडलेले राहणे आणि त्याच वेळी आधुनिक विज्ञानाचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
आदिवासींना आधुनिक शिक्षणाच्या उपयुक्त पैलूंशी जोडल्याने स्थानिक तरुणांना देशाच्या समन्यायी विकासात महत्त्वाची भूमिका बजावणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279644)
आगंतुक पटल : 6