अर्थ मंत्रालय
पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या सीमा शुल्कावरील संपूर्ण सूट 15 जुलै 2026 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये निर्माण होणारा व्यत्यय यांचा विचार करून केंद्र सरकारने याआधी महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या सीमा शुल्कात 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतला होता.
या कालावधीत भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सूट जाहीर करण्यात आली होती. आता परिस्थिती हळूहळू सुधारत असताना, प्रभावित क्षेत्रांकडे सुरळीत आणि विना-व्यत्यय स्थित्यंतर सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही सूट आणखी 15 दिवसांसाठी म्हणजेच 15 जुलै 2026 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी सूचित केल्याप्रमाणे, यामध्ये समाविष्ट असलेल्या उत्पादनांची यादी जैसे थे ठेवण्यात आली आहे.
भारताच्या निर्मिती क्षेत्राला पाठबळ देण्याप्रती सरकार कायमच वचनबद्ध आहे. पूर्वीप्रमाणेच, सदर सवलत पेट्रोरसायनांच्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या प्लास्टिक, पॅकेजिंग, वस्त्रे, औषधे, रसायने, वाहनांचे सुटे भाग तसेच उत्पादनसंबंधित इतर विस्तृत श्रेणीच्या क्षेत्रांसाठी लाभदायक ठरणार आहे. यातून अंतिम उत्पादनांच्या ग्राहकांना देखील दिलासा मिळेल.
अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाची लिंक:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2248152®=3&lang=1
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279517)
आगंतुक पटल : 13