सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगर येथून गुजरातसाठी ‘भारत टॅक्सी’चे उद्घाटन केले; अहमदाबाद, सुरत आणि राजकोटसह गुजरातमधील सर्व प्रमुख शहरांमध्ये दुचाकी, ऑटो आणि चारचाकी श्रेणींमध्ये सेवा सुरू
Posted On:
27 JUN 2026 6:24PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये सहकार तत्त्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ या प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे गुजरातसाठी उद्घाटन केले. ‘भारत टॅक्सी’चा उद्देश टॅक्सी, ऑटो आणि दुचाकी वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या सारथींना मालकी हक्क, सन्मान, सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करताना नागरिकांना विश्वासार्ह आणि सेवाभिमुख वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या प्रवासी वाहतूक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले की, देशाच्या विकासाबरोबरच टॅक्सी आणि वाहतूक सेवांची गरज प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे. टॅक्सी ही संकल्पना आता केवळ चारचाकी वाहनांपुरती मर्यादित राहिलेली नाही; दुचाकी, ऑटो आणि इतर शहरी वाहतूक सेवांचाही त्यात समावेश झाला आहे. गुजरातमध्ये ‘भारत टॅक्सी’ची सुरुवात ही सहकाराच्या माध्यमातून या व्यापक वाहतूक गरजेला नवी दिशा देणारे पाऊल आहे.

अमित शाह यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी’चा मुख्य उद्देश सारथी आणि ग्राहक या दोघांचेही होणारे शोषण थांबवणे, सेवेचा दर्जा उंचावणे आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रात न्याय्य व्यवस्था निर्माण करणे हा आहे.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री यांनी सारथी आणि ग्राहकांना आवाहन केले की, दीर्घकालीन, विश्वासार्ह आणि न्याय्य वाहतूक व्यवस्था उभी करायची असेल, तर ‘भारत टॅक्सी’ यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

या कार्यक्रमादरम्यान ‘भारत टॅक्सी’च्या विस्तारासाठी आणि सुरळीत कार्यान्वयनासाठी विविध संस्थांसोबत सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2278507)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam