राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभा दालनात नवनिर्वाचित/पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ/प्रतिज्ञा दिली

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2026 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2026

राज्यसभेचे अध्यक्ष  सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेच्या दालनात दहा नवनिर्वाचित/पुनर्निर्वाचित  सदस्यांना शपथ/प्रतिज्ञा दिली. यात, प्रवीण चक्रवर्ती, देबाशिष सामंतराय, सना सतीश बाबू, विजय चिंतकयला, भाष्यम रामा कृष्णा, लिंगमनेनी रमेश, राजेश परमानंद शुक्ला, बैद्यनाथ राम, नथवानी परिमल आणि ताई तगाक यांचा समावेश आहे.

या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी हिंदी भाषेत, एका सदस्याने इंग्रजी भाषेत, एकाने तमिळ भाषेत आणि तीन सदस्यांनी  तेलुगु भाषेत शपथ/प्रतिज्ञा घेतली. या सदस्यांपैकी चार सदस्य आंध्र प्रदेशातील, दोन झारखंड मधील असून,  तामिळनाडू, गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि ओदिशा  या राज्यातील आहेत .

या प्रसंगी, केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सभागृहातील अन्य सदस्यांसोबत इतर मान्यवर; राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी आणि सचिवालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2278026) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada