पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2026 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2026
 

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ॲमेझॉनची भारतातली 48 अब्ज डॉलरची विक्रमी गुंतवणूक ही भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात वाढणारे स्वारस्य दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर (X) पोस्ट केले:

"अँडी जॅसी यांच्यासोबत उत्तम भेट झाली. मी ॲमेझॉनच्या भारतातल्या विक्रमी 48 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे स्वागत करतो. यामुळे आमच्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील. त्याच वेळी, यातून भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात वाढणारे स्वारस्य दिसून येते! 

@amazon"

 
निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277780) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Kannada