पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात परभणी येथे  भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 20 JUN 2026 6:53PM by PIB Mumbai


महाराष्ट्रात परभणी येथे  भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी शोकसंतप्त कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने 'X' वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे,
"महाराष्ट्रातील परभणी येथे भिंत कोसळून झालेली जीवितहानी अत्यंत क्लेशदायक आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या जिवलग व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi"

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2275823) अभ्यागत कक्ष : 53