पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन निवेदन

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2026 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2026

पश्चिम आशियातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना नियमितपणे अद्ययावत माहिती देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

•  सर्व तेल शुद्धीकरण केंद्रे उच्च क्षमतेने कार्यरत असून, त्यांना कच्च्या तेलाचा समाधानकारक पुरवठा होत आहे तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचा देखील पुरेसा साठा राखण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

• एलपीजीच्या देशांतर्गत वापराला मदत करण्यासाठी रिफायनरीजमधून होणारे एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे.

• देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

• मार्च 2026 पासून सुमारे 10.02 लाख पीएनजी जोडण्या गॅसिफाय करण्यात आल्या आहेत तसेच 3.22 लाख अतिरिक्त जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता या एकूण जोडण्यांची संख्या 13.24 लाखांवर पोहोचली आहे. तसेच, सुमारे 9.94 लाख ग्राहकांनी नव्या जोडण्यांसाठी नावनोंदणी केली आहे.

गेल्या 3 दिवसांत बुकिंग करण्यात आलेल्या 1.36 एलपीजी सिलेंडर्सच्या बुकिंगच्या तुलनेत  सुमारे 1.47 कोटी एलपीजी सिलेंडर्स वितरीत करण्यात आले.

गेल्या 3 दिवसांत -

• 5 किलो वजनाचे सुमारे 1.98 लाख एफटीएल सिलेंडर्स विकले गेले.

• 1334 शिबिरांच्या माध्यमातून 5 किलो वजनाच्या एकूण 19,100 एफटीएल सिलेंडर्सची विक्री देखील झाली आहे.

• एकूण 22945 टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे. 

• सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (पीएसयू ओएमसीज) वाहनांसाठी लागणाऱ्या सुमारे 928 टन एलपीजीची विक्री केली.

• पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची साठेबाजी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून  कारवाई सुरु ठेवण्यात आली आहे.

• एलपीजीशी संबंधित अंमलबजावणी – गेल्या 3 दिवसांत, देशभरात 21 प्राथमिक तपासणी अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आले आहेत, 6 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि 1056 सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत.

• त्याचप्रमाणे पीएसयुज ओएमसीजच्या अधिकाऱ्यांतर्फे अचानक तपासणी सत्रे राबवणे सुरु ठेवले आहे.

• एलपीजी – गेल्या 3 दिवसांत 8 एलपीजी वितरकांवर बेशिस्त वर्तणुकीबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

• किरकोळ दुकाने – गेल्या 3 दिवसांत 4 किरकोळ दुकानांना दंड ठोठवण्यात आला आणि बाजारपेठ शिस्तविषयक मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्याबद्दल 598 किरकोळ दुकानांचे कामकाज स्थगित ठेवण्यात आले.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने पर्शिया आखातातील सागरी सद्यस्थिती, तसेच या भागातील भारतीय जहाजे आणि कर्मचारीवर्ग यांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. 

• माल्टाचा ध्वज असलेले, एससीआयच्या नेतृत्वातील  कंसोर्टियमद्वारे व्यवस्थापित, दिशा हे एलएनजीवाहक जहाज (आयएमओ: 9250713) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 15 जून 2026 रोजी सुरक्षितपणे बाहेर पाडले आहे. भारतात दहेज येथे जाण्यासाठी निघालेल्या या जहाजावर सुमारे 62,370 टन एलएनजी आहे. हे जहाज 19 जून 2026 रोजी दहेजला पोहोचेल.  

• नौवहन  महासंचालकांच्या नियंत्रण कक्षातून मिळालेली अद्ययावत माहिती: या नियंत्रण कक्षाचे कामकाज सुरु झाल्यापासून या कक्षाने 13,187 दूरध्वनी कॉल्स आणि 29,376 पेक्षा अधिक ईमेल्सची हाताळणी केली आहे. गेल्या 72 तासांत, नाविक, त्यांचे कुटुंबीय तसेच सागरी क्षेत्रातील भागधारक यांच्याकडून एकूण 450 कॉल्स आणि 1,077 ईमेल्स प्राप्त झाल्या आहेत.

• नौवहन महासंचालकांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयाने आतापर्यंत, 3,639 भारतीय नाविकांचे सुरक्षित मायदेशी आगमन सुनिश्चित केले आहे आणि यामध्ये आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 72 तासांमध्ये स्वदेशी आणण्यात आलेल्या 47 नाविकांचा समावेश आहे.

 

सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274939) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam