पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिस्ट्रल एआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्थर मेंश यांच्यासोबत,विश्वासार्ह एआय,नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर चर्चा
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2026 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मिस्ट्रल एआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्थर मेंश यांच्यासोबत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे बदलत आणि उन्नत होत जाणारे परिदृश्य यासह इतर विषयांवर चर्चा केली.
यावेळी, विश्वासार्ह एआय, नवोन्मेष आणि एआय मानवकेंद्री तसेच सर्वसमावेशक राहील, याची खातरजमा करण्याची गरज, अशा विषयांवर दोघांनीही आपापली मते मांडलीत , असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यावेळी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विविध क्षेत्रात, भागीदारी करण्याच्या भारतातील संधींविषयी देखील यावेळी चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
मानवतेला अधिक सक्षम करत, तसेच नवोन्मेष, विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला बळकट करत, एआय सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे;
“मिस्ट्रल एआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्थर मेंश यांच्यासोबत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे बदलत आणि उन्नत होत जाणारे परिदृश्य यासह इतर विषयांवर चर्चा केली. यावेळी, विश्वासार्ह एआय, नवोन्मेष आणि एआय मानवकेंद्री तसेच सर्वसमावेशक राहील, याची खातरजमा करण्याची गरज, अशा विषयांवर दोघांनीही आपले विचार मांडले.
एआयशी संबंधित, विविध क्षेत्रात, भागीदारी करण्यासाठी भारतात असलेल्या संधींवरही यावेळी चर्चा झाली. मानवतेला अधिक सक्षम करत, तसेच नवोन्मेष, विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला बळकट करत, एआय सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.”@arthurmensch @MistralAI”
सोनाली काकडे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274896)
आगंतुक पटल : 8