गृह मंत्रालय
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घेतली भेट
भारत-अमेरिकेमधील सुरक्षाविषयक, विशेषतः दहशतवाद-विरोधी आणि अमली पदार्थ विरोधी क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक भागीदारी पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध आहे: अमित शाह
Posted On:
18 JUN 2026 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री अमित शाह एक्स वरील पोस्टमध्ये म्हणाले,"भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सुरक्षा क्षेत्रात, विशेषत: दहशतवाद विरोधी आणि अमली पदार्थ विरोधी क्षेत्रात सहकार्य आणखी मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली.”
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांचा दोन्ही देशातील नागरिकांना फायदा होईल हे सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे".
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2274735)
अभ्यागत कक्ष : 49
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam