गृह मंत्रालय
मोदी सरकारची 12 वर्षे विकास आणि वारसा यांच्या संगमाचा सुवर्णकाळ असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
गेल्या 12 वर्षांत भारताने जागतिक दर्जाची संपर्क-व्यवस्था, पायाभूत सुविधा, पीएम आवास योजना, आयुष्मान भारत आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रगती साधली: अमित शाह
विकास आणि वारसा एकमेकांना पूरक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे: अमित शाह
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2026 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
गेल्या 12 वर्षात विकास आणि सांस्कृतिक वारसा या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन देण्यात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज प्रकाश टाकला.
'एक्स' (X) वरील पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, "मोदी सरकारची 12 वर्षे विकास आणि वारसा यांचा संगम असलेले सुवर्ण युग ठरले आहे. या 12 वर्षात एकीकडे श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकालाचे बांधकाम झाले, तर दुसरीकडे पीएम आवास योजना, आयुष्मान भारत, अन्न भंडार, जागतिक दर्जाची संपर्क व्यवस्था, पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांनी देशाच्या विकासाच्या प्रवासाला अभूतपूर्व गती दिली आहे.
एक कोटी अभिलेखांचे डिजिटलायझेशन करून, 668 प्राचीन कलाकृती भारतात परत आणून, 11 आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांची स्थापनाआणि 11 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देऊन, पंतप्रधान मोदी यांनी हे दाखवून दिले आहे की, विकास आणि वारसा, हे एकमेकांना पूरक आहेत."
* * *
नाना मेश्राम/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274533)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam